शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद कॉलनीतील टाकी म्हणजे पांढरा हत्ती

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविणारी वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे चित्र आहे. शहरातील विवेकानंद कॉलनीत बांधकाम करण्यात आलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही

गोंदिया : शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविणारी वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे चित्र आहे. शहरातील विवेकानंद कॉलनीत बांधकाम करण्यात आलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही पाणी पुरवठा सुरू न झाल्याने ही टाकी फक्त पांढरा हत्ती वाटू लागली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून तारीख पे तारीख दिली जाते मात्र पाणी पुरवठा सुरू न झाल्याने पाणी कधी मिलणार असा सवाल परिसरातील नागरिक करू लागले आहेत. शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविण्याचे आश्वासन देत वाढीव पाणी पुरवठा योजनेचा गाजावाजा करण्यात आला. शहरातील विवेकानंद कॉलनीत या योजनेंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. ३१.३५ लख लिटर क्षमता असलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर या योजनेच्या पाईपलाईनसाठी परिसरातील चांगल्यात चांगले रस्ते खोदण्यात आले. विभागाकडून पाणी पुरवठा सुरू करण्याच्या नावावर तारीख पे तारीख दिली असून हा प्रकार मार्च महिन्यापासून सुरू आहे. वास्तवीक मात्र पाणी पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. उन्हाळ््यात या योजनेच्या पाईप लाईनमधील लिकेज शोधण्याचे काम सुरू होते. त्यावेळीही अधिकाऱ्यांनी दहा-पंधरा दिवसांचा कालावधी सांगून वेळ मारून नेली. मात्र पाणी पुरवठा काही सुरू झाला नाही. आता उन्हाळाच काय पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. मात्र विवेकानंद कॉलनीतील ही वाढीव पाणी पुरवठा योजनेची टाकी पांढरा हत्ती बनून उभी आहे. शहरातल्या मामा चौक पासून पुढे विवेकानंद कॉलनी नव्याने तयार होत असलेल्या अन्य कॉलनींत नळ योजना नसल्याने बोअरचे पाणी येथील रहिवाशांना प्यावे लागते. बोअरच्या पाण्याची चव वेगळीच असून पाणी जड असल्याने पाणी पुरवठा आल्यास यापासून मुक्ती मिळणार अशी आशा येथील रहिवासी लाऊन बसले होते. मात्र विभागाकडून सुरू असलेली टोलवाटोलवी बघता आता नागरिकांच्या डोक्यावरून पाणी जात असून पाणी पुरवठा कधी सुरू होणार असा सवाल ते करीत आहेत. तर मजीप्राचे अधिकारी एक ना एक कारणं पुढे करून आपली बाजू सावरत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)