शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालय ठरतेय पांढरा हत्ती

By admin | Updated: October 27, 2014 22:40 IST

आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या

हरिदास ढोक - देवळी आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या लोकोपयोगी ठरत नाही. वास्तूच्या उद्घाटनापासून तर आजच्या घटकेपर्यंत दोन महिन्याचा काळ झाला तरी येथे कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही. केवळ दोन परिचारिकेच्या भरवशावर रुग्णालयाचे काम सुरू आहे. यामुळे ही इमारत येथील नागरिकांकरिता केवळ शोभेची ठरत आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून वर्धा मार्गावर साडेचार एकराचे परिसरात तीन कोटींच्या खर्चातून ग्रामीण रुग्णालाची सुसज्ज इमारत तर दीड कोटीच्या खर्चातून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. या वास्तूचे बांधकाम गत दीड वर्षापूर्वीच पूर्णत्वास येऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते; परंतु आमदार रणजीत कांबळे यांनी केलेला विकास लोकांच्या गळी ताजा-ताजा उतरविण्यासाठी या रुग्णालयाचे उद्घाटन विधानसभांच्या निवडणुकीपर्यंत ओढण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण म्हटल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या निकषाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या भरती सोबतच रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, एक्सरे मशीन, शवविच्छेदनाची व्यवस्था व इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची आरोग्य विभागाची बांधीलकी आहे; परंतु आजच्या तारखेपर्यंत यापैकी कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्णालय नावापुरते राहिले आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतुद बजेटमध्ये न केल्यामुळे या रुग्णालयातील १४ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मार्च महिन्यापर्यंत खोळबंल्या आहे. रुग्णालयाला २५ ते ३० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना पहिल्या टप्प्यात फक्त १४ कर्मचाऱ्यांची तरतुद करणे, हे सुध्दा न सुटणारे कोडे आहे. या १४ कर्मचाऱ्यांमध्ये एक वैद्यकीय अधीक्षक, तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, एक परिचारक व दोन चपराशांचा समावेश आहे. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल नारलवार यांना याठिकाणी कागदोपत्री प्रतिनियुक्तीवर देण्यात आले; परंतु पुलगाव शहराचा कार्यभार सांभाळून त्यांना याठिकाणी वेळ देणे शक्य होत नसल्यामुळे त्यांचे प्रतिनियुक्ती नावापुरतीच ठरत आहे. ३० खाटांची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची भरती गत दोन महिन्यात निरंक आहे. बाह्यरुग्ण नोंदणी सुध्दा नगन्यच आहे. शवविच्छेदनासाठी वास्तू आहे; परंतु कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ती कुचकामी ठरत आहे. खाटा, गाद्या, प्रसूती विभाग आदींची व्यवस्था असून कर्मचाऱ्यांच्या अभावी त्या निरुपयोगी ठरत आहेत. एक्सरेची मशीन नसल्यामुळे या रुग्णालयाचा खेळखंडोबा झाला आहे. अ‍ॅम्बुलन्स नसल्यामुळे हे रुग्णालय विकासाचा पांढरा हत्ती ठरले आहे.