जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 06:58 IST2024-03-08T06:57:52+5:302024-03-08T06:58:46+5:30

गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महायुतीमध्ये  सगळे मिळून वाटाघाटी करू आणि तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले.

What is wrong in claiming seats ask ajit Pawar | जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार

जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार

गोंदिया : आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीत जागावाटपावरून सध्या बैठका आणि चर्चेचे सत्र सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जेवढ्या जागा शिवसेनेला मिळतील, तेवढ्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात असे मत व्यक्त केले होते.  यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय आहे? भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी भुजबळ यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. 

गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महायुतीमध्ये  सगळे मिळून वाटाघाटी करू आणि तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले.
 
Web Title: What is wrong in claiming seats ask ajit Pawar