शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेचे पाणी आटण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 12, 2016 01:55 IST

डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पेयजलाची समस्या : आजपासून ‘वन टाईम’ पाणी पुरवठागोंदिया : डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जे पाणी वितरण शहराला दोन्ही वेळा केला जात होता, त्यात आता कपात केली जात आहे.दुष्काळाचा प्रभाव संपूर्ण राज्यात मागील एक महिन्यापासून दिसत आहे. आता तो प्रभाव गोंदिया जिल्ह्यातही दिसू लागला आहे. गोंदियासह तिरोडा शहरातही पाणी पुरवठा करण्यात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची कपात न करण्यासाठी वैनगंगा नदीवर बंधारा बनविला होता. परंतु तो बंधारा बिनकामाचा ठरला. वैनगंगा नदीच्या आत जी विहीर बनली आहे, त्यात पाण्याचा साठा कमी होत आहे. याच प्रमुख कारणामुळे शहरात पाण्याची कपात केली जात आहे.दरवर्षी मे महिन्यात गोंदिया शहरात पाण्याची टंचाई उद्भवते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे मे महिन्यात विहिरीत पाण्याच्या कमी होणारा साठा वाढविण्यासाठी कसलाही निर्णय घेण्यात आला नाही. सद्यस्थितीत बनविण्यात आलेल्या बंधाऱ्यात हव्या त्या प्रमाणात साठा होत नाही. याच बंधाऱ्यासारखे आणखी काही बंधारे नदीमध्ये जर बनविण्यात आले तर विहिरीत पाणी साठा वाढू शकेल. तसेच सध्या बनविण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या सभोवारची रेती हटविण्यात आली तर या बंधाऱ्यात पुढी वर्षी पाण्याचा साठा अधिक होवू शकेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैनगंगा नदीच्या आत जी विहीर आहे तिची क्षमता १८ एमएलची आहे. त्याद्वारे शहराच्या पाचही पाणी टाक्यांमध्ये पाणी भरले जावू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की एक एमएल म्हणजे १० लाख लिटर होते. याचा अर्थ सद्यस्थितीत विहिरीला दोष दिले जावू शकत नाही. ही विहीर १८० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता ठेवते. शहरात पाणी जे सकाळच्या वेळी अर्ध्या तासासाठी दिले जाते, त्याच्य बरोबर वितरणासाठी शहरवासियांनी घरांमध्ये टुल्लू पंपांचे वापर करू नये, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी केले आहे.