शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन मागविले होते ‘ते’ दोन चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

अल्पवयीन बालकांमध्ये भर चौकात खून करण्याचे वाढलेले धाडस हे समाजात गुन्हेगारी कशी डोके वर उचलू पाहात आहे याचे हे मोठे उदाहरण आहे. सहजरित्या घातकशास्त्रही ऑनलाईनच्या माध्यमातून सहज मिळविता येतात हे या प्रकरणावरून लक्षात येते. गुन्हेगारीसाठी आता ऑनलाईनचा आधार घेतल्या जात आहे.

ठळक मुद्देकान्हा शर्मा खून प्रकरण : दीड महिन्यांपूर्वी मागविले होते

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कान्हा शर्मा (१७) या अल्पवयीन मुलाच्या खुनाने अवघ्या जिल्ह्यातच हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या निर्दयतेने कान्हाला ठार करण्यात आले यावरून अल्पवयीन मुले किती निष्ठूर झालेत याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, कान्हाला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले चाकू पोलिसांनी जप्त केले असून आरोपींनी ते ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागविले होते अशी माहिती आहे.कान्हा शर्माचा खून करणारी दोन्ही मुले मद्यप्राशन करून होती. त्यांनी त्याचा खून करण्याचा चंग आधीच बांधला होता. २३ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग म्हणून त्या दोघांनी कान्हा शर्मावर दोन चाकूने सपासप असे १८ घाव घालून त्याचा खून केला. खून करताना गळाही चिरडण्यात आला. खून करणाऱ्या बालकांपैकी एक विस्की तर दुसरा बियरच्या नशेत होता. अ‍ॅक्टीव्हाच्या डिक्कीत ते दोन्ही चाकू ठेवून कान्हाचा ते पाठलाग करीत होते. त्याला मनोहर चौकात गाठून भर चौकात त्याचा खून केला.अल्पवयीन बालकांमध्ये भर चौकात खून करण्याचे वाढलेले धाडस हे समाजात गुन्हेगारी कशी डोके वर उचलू पाहात आहे याचे हे मोठे उदाहरण आहे. सहजरित्या घातकशास्त्रही ऑनलाईनच्या माध्यमातून सहज मिळविता येतात हे या प्रकरणावरून लक्षात येते. गुन्हेगारीसाठी आता ऑनलाईनचा आधार घेतल्या जात आहे. खून केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असताना ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील रिंग रोडवर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, शिपाई वालदे, चकोले, वेदक, दराडे, राठोड, रॉबीन साठे, गायधने मेहर यांनी सापळा रचून त्यांना पकडले. गोंदिया शहरात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे बालकांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.ऑनलाईन शॉपिंगचा असाही वापरधावपळीच्या जीवनात विविध सामांनाची खरेदी सोपी व्हावी यासाठी आॅनलाईन शॉपिंग अत्यंत फायद्याची ठरत आहे. घरगुती सामानापासून आता किरानाही आॅनलाईन बोलाविता येतो. त्यात मात्र आता हत्यारेही मागविली जाऊ लागल्याचे कान्हा शर्माच्या खूनातून उघडकीस आले. आरोपींनी वापरलेले चाकू ऑनलाईन मागविण्यात आले असून आॅनलाईन शॉपिंगचा आता असाही वापर होत असल्याचे बघून सर्वच अवाक् झाले आहेत.

टॅग्स :Murderखून