शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 28, 2016 01:36 IST

तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आला. ४४.०५ दलघमी (१५.५६ टी.एम.सी.) पाणी क्षमतेच्या या प्रकल्पात वैनगंगा नदीतील ३२७ द.ल.घ.मी. (११.५५ टी.एम.सी.) पाणी शेतीसाठी आहे. मात्र संबंधित यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे.या प्रकल्पातून अदानी वीज प्रकल्पासाठी वार्षिक २.४७ टी.एम.सी. पाणीसाठा पुरवठा करण्यास शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार पाणी पुरवठा केला जातो. पण शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणतेही नियोजन केले जात नाही. या प्रकल्पात पाणी भरले असल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन करुन विद्युत पंप लावले. अनेक बेरोजगार शेतीकडे वळले. पण वैनगंगेत पाणीच नसल्याने संपूर्ण लावलेले रबी पीक जळून गेले आहे. लाखो रुपये खर्च करुनही हाती काहीच येणार नाही. उलट कर्जाचा बोझा वाढणार आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, बिहिरीया, मुरदाडा, महालगाव, किडंगीपार, करटी बु., इंदोरा व इतर ठिकाणी बोअरवेलने उपसा केला जातो. मात्र परसवाडा खैरलांजी, बोरा, बघोली व इतर गावे तहानलेलीच आहेत. प्रकल्पात फक्त ४ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पात १७.५ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध होता. ते पाणी गेले कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कवलेवाडा ते सावरापर्यंत वैनगंगा नदी तुडूंब भरून होती. १५ मार्च पर्यंत पाणी होते. अचानक पाणी एवढ्या झपाट्याने एका महिन्यात कमी झाले कसे? धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेतकऱ्यांना पाणी देणे बंद होते. त्या कालावधीत कार्यकारी अभियंता यांनी प्रकल्पातील दोन-तीन दार उघडून पाणी सोडले असल्याने पाणीसाठा कमी झाला. नियोजन बरोबर नसल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटले. शेतकऱ्यांना भोगावे लागले. (वार्ताहर)‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई होणार?प्रकल्पात एवढे मुबलक पाणी होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी रबी पीक घेण्याची मानसिकता तयार केली व शेतीची मशागत केली. पीक लावले, मात्र शेवटच्या टोकावर आलेल्या शेतात पाणीच पोहोचले नाही. पाणीसाठा कमी असल्याचे कधीही कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना सांगितले नाही. साधी नोटीसही दिली नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पाणीसाठा कमी झाल्याने डबक्यातील पाणी जेसीबीच्या साह्याने नाली करून पंपाजवळ नेले जात आहे.बावनथडी व संजय सरोवराचे पाणी सोडाबावनथडी प्रकल्प वैनगंगा बपेरा चांदोरीपासून ४० ते ५० कि.मी. अंतरावर आहे. या धरणातून पाणी सोडले तर रात्रभरात पाणी वैनगंगेत येते. संजय सरोवराचे पाणी दोन-तीन दिवसात येते. पाणी कधी सोडले जाणार अशी विचारणा शेतकऱ्यांनी आ.विजय रहांगडाले यांच्याकडे केली. त्यांनी संजय सरोवरचे पाणी सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याचे सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी मुरदाड्यात आमदारांना व्यथा सांगितली आहे. पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र पाणी मिळाले नाही. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मे महिन्यात येणार असल्याचे सांगितले जाते.