शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे चौकीला उड्डाण पुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक- ६ मधील नहर रोड, अनिहा नगर व कामठा ...

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य

आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक- ६ मधील नहर रोड, अनिहा नगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून कचरापेटी लावण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

....

झाडे जगवा उपक्रम कागदोपत्री

पांढरी : पांढरीसह माहुली व भुसारीटोला या गावांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम राबवून कंत्राटदाराने झाडांची लागवड केली. परंतु त्यांची जोपासना न केल्याने कित्येक झाडे वाळली असून उर्वरित मरण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे झाडांचे संगोपन होत असल्याचे कागदोपत्री दाखवून बिलाची उचल होत असल्याची ओरड होत आहे. एकंदर ‘झाडे लावा-झाडे जगवा’उपक्रम कागदोपत्री दिसत आहे.

....

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

गोंदिया : गेल्या ६-७ महिन्यांपासून वयोवृध्द निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी आहे.

लाभापासून कर्मचारी वंचित

सडक-अर्जुनी : शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून वर्षभराचा कालावधी झाला. परंतु वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आला नाही.

कचरापेट्यांकडे दुर्लक्ष

केशोरी : येथील ग्रा.पं.स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेटा बसविण्यात आल्या. मात्र या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडूंब भरल्या आहेत.

हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त

गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असून त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. ही वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी

सालेकसा : वातावरण बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व कीटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प

गोरेगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मात्र वाहतूक ठप्प होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

धानपिकाचे नुकसान

गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गंत साझा क्रमांक- २६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून त्यामुळे धान पीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुकर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.