राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

By Admin | Updated: May 5, 2016 01:56 IST2016-05-05T01:56:09+5:302016-05-05T01:56:09+5:30

महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील

Village Observer Day at Rajguda and Sindhi | राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

गोंदिया : महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील राजगुडा व सिंदीपार येथे एक दिवस मजुरासोबत राहून ग्रामरोजगार दिवस साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी उपसभापती विलास शिवणकर होते. उदघाटक म्हणून तहसीलदार व्ही.एम. परळीकर होते. अतिथी म्हणून सरपंच पुष्पमाला पंचभाई, सहायक कार्यक्र म अधिकारी भारत बोदेले, तांत्रिक अधिकारी मुनेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती.
तहसीलदार परळीकर म्हणाले, ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले आहे अशा मजुरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येईल. आम आदमी विमा योजना व कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. या वेळी त्यांच्या हस्ते महसूल विभागाकडून मजुरांना आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, उत्पन्नाचे दाखले, सात-बारा देण्यात आले. सन २०१६-१७ च्या मजुरांची तरतूद व नियोजन आराखडा सरपंचांना देण्यात आला.
सहायक कार्यक्रम अधिकारी बोदेले यांनी मग्रारोहयोविषयी ग्रामस्थांना व्ययक्तिक शौचालय, सिंचन विहिरी, गुरांचा गोठा, शोषखड्डे व कृषी कामाबाबदची माहिती दिली. राजगुडा हे गाव जंगलव्याप्त असून आदिवासी बांधवांची बहुसंख्या या गावात जास्त आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये राजगुडा (मोगरा) सन २०१६-१७ मध्ये घेण्यात आले आहे. या गावामध्ये विविध कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Village Observer Day at Rajguda and Sindhi