शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

By admin | Updated: October 3, 2015 01:42 IST

येथे पशूवैद्यकीय दवाखाना म्हणजे कृत्रीम रेतन केंद्र बऱ्याच काळापासून आहे

१५ वर्षांपासून डॉक्टर नाही : बदलीच्या ठिकाणी येण्यास टाळाटाळगोठणगाव : येथे पशूवैद्यकीय दवाखाना म्हणजे कृत्रीम रेतन केंद्र बऱ्याच काळापासून आहे. मात्र डॉक्टरअभावी जून २००१ पासून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर काम सुरु आहे. प्रभारी अधिकारीसुद्धा नाममात्र आहेत. त्यामुळे सदर पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या १५ वर्षांपासून वाऱ्यावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.जून २००१ पूर्वी येथे डॉ. दुसावार कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर सदर कृत्रिम रेतन केंद्रात एकही डॉक्टर रुजू झाला नाही. त्यामुळे १५ वर्षांपासून गोपालकांना आपल्या जनावरांवर योग्य औषधोपचार करता येत नाही. उपचाराअभावी अने जनावरे मृत्यूमुखी पडतात. या प्रकाराने त्यांच्यावर आपली जनावरे विकण्याची वेळ आली आहे. वातावरण बदलामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात. मात्र वेळेवर उपाचार होत नसल्यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडतात. या प्रकारामुळे शेतकरी व गोपालक त्रासले असून त्वरित पशूवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात आले. परंतु उपयोग त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गोठणगाव येथील कृत्रिम रेतन केंद्र श्रेणी ०२ साठी पशुवैद्यकीय अधिकारी अ.दि. खामगावर (जिल्हा कृत्रिक रेतन केंद्र बीड) यांना पशुसंवर्धन खात्याचे आदेश (एजीओ-३ (प्र.क्र. ४१४) (बदली)/५४६/२०१५ पस-१ पुणे-६ दि. ३०/०५/२०१५ व सहायक/पस/१६/२०१५, पुणे-६ दि.१०/०६/२०१५) नुसार सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अर्जुनी-मोरगाव, रापवैद श्रेणी-२ गोठणगाव जि. गोंदिया येथे बदलीचे आदेश देण्यात आले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकारी अद्यापही रुजू झालेले नाही. यावरुन असे निदर्शनात येते की सदर ठिकाणी रुजू होण्यास ते टाळाटाळ करीत आहेत किंवा पसंतीच्या ठिकाणी रुजू व्हावे, अशी त्यांची मागणी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र गोठणगाव परिसरातील शेतकरी व गोपालक त्रस्त झाल्यामुळे रुजू होणे सक्तीचे करुन गोपालकांच्या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)परिचर झाले डॉक्टरपशु वैद्यकीय दवाखान्यात एक डॉक्टर व एक परिचर अशा दोन जागा आहेत. परंतु १५ वर्षांपासून डॉक्टर नसल्यामुळे परिचर हुपचंद भैसारे डॉक्टरची भूमिका निभवताना दिसतात. तेसुद्धा एका आठवड्यामध्ये दोन दिवस गोठणगाव तर चार दिवस सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, अर्जुनी-मोरगाव येथे त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. जुलै २०१४ पासून पशुवैद्यकीय अधिकारी मदीकुंटावार यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. परंतु गोठणगाव कुठे आहे? हेसुद्धा त्यांना माहीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.