शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १४५ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर १८ ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी वेगळी पाच केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी ५ हजार लसींचे डोस उपलब्ध करून दिले आहेत; पण ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी लसींचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने सध्या केवळ १३० केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे.

ठळक मुद्देअनेकांना केंद्रावरून परतण्याची वेळ : नागरिकांमध्ये असंतोष : आरोग्य विभागही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचा भरसुद्धा लसीकरण मोहिमेवर आहे. अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे शासनाकडून जिल्ह्याला नियमित लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यासाठी जिल्ह्याला दररोज ५०० डोसची गरज आहे; पण पुरवठा केवळ २०० डोसचा होत आहे. अनेकदा तर तो सुद्धा पुरवठा होत नसल्याने मोहीम बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर येते. सध्या गोंदिया जिल्ह्याला कोविशिल्डचे ११ हजार डोस आणि कोव्हॅक्सीनचे ३४०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमेला थोडी गती आली. दररोज ६४८९ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; पण लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हे डोसदेखील लवकरच संपण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहीम अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शासनाने लसींचा नियमित पुरवठा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागांत लसीकरण बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर गेल्यानंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन व्यापक स्तरावर लसीकरण मोहिमेसाठी जिवापाड परिश्रम घेत आहेत. 

१३० केंद्रांवरून लसीकरण सुरू जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १४५ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर १८ ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी वेगळी पाच केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी ५ हजार लसींचे डोस उपलब्ध करून दिले आहेत; पण ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी लसींचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने सध्या केवळ १३० केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. 

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाचेही आणि दुसरा डोस घेणारे ही येथेच - १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचेही आणि दुसरा डोस घेणारे ही येथेच येत असल्याने आरोग्य विभागाने लसीकरणादरम्यान गोंधळ उडू नये यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडवा उपकेंद्र, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी व अर्जुनी ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी व्यवस्था केली आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयासह १४५ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. लसीकरणासाठी सकाळी ८ वाजेपासूनच रांगा- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शहरातील कुडवा येथील केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर सकाळी ८ वाजेपासून युवकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका दिवशी एका केंद्रावरून १०० नागरिकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस