अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून; मुर्री येथील घटना, दोन आरोपींना अटक  

By अंकुश गुंडावार | Published: January 24, 2024 07:14 PM2024-01-24T19:14:52+5:302024-01-24T19:15:11+5:30

गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Unidentified youth stoned to death Murree incident, two accused arrested | अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून; मुर्री येथील घटना, दोन आरोपींना अटक  

अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून; मुर्री येथील घटना, दोन आरोपींना अटक  

गोंदिया: दगड आणि विटांनी ठेचून एका अनोळखी युवकाचा दोन आरोपींनी खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहरालगत असलेल्या मुर्री येथे उघडकीस आली. या घटनेत गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नितीन शरणागत व चंद्रमा उखरे, रा.मुर्री अशी अज्ञात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींची नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुशांत धारगावे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना एमडीटीवर आर्यन चुटे याने काॅल करून मुर्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या फाटकासमोर अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. यावरून धारगावे आणि त्यांचे सहकारी पोलिस शिपाई बाळणे यांनी घटनास्थळ गाठले.

दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत ३५ ते ४० वयोगटातील अनोखळी व्यक्ती पडलेला दिसला. त्याच्या आजूबाजूस विटाचे तुकडे पडलेले होते. त्याच्या डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर व शरीरावर जखमा होत्या. दगड, विटांनी चेहरा ठेचण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतील त्या युवकाला येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी मुर्री येथील नितीन शरणागत व चंद्रमा उखरे यांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी त्या युवकाचा नेमका कोणत्या कारणामुळे खून केला, हे तपासात पुढे येईल. पुढील तपास पीएसआय सैदाने करीत आहेत.
 
खूनाचे कारण गुलदस्त्यात
मुर्री येथील दोन आरोपींना अज्ञात युवकाचा खून नेमका कुठल्या कारणावरुन केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच या खून प्रकरणाचे रहस्य उलगडेल तसेच खून झालेल्या अज्ञात युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

Web Title: Unidentified youth stoned to death Murree incident, two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.