शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळा; न्यायासाठी धडपड

By admin | Updated: May 2, 2015 01:48 IST

मागील १० ते १५ वर्षांपासून जिल्ह्यातील विना अनुदानित शाळांत शिक्षक व शिक्षकेतर उपाशीपोटी सेवा देत आहेत.

गोंदिया : मागील १० ते १५ वर्षांपासून जिल्ह्यातील विना अनुदानित शाळांत शिक्षक व शिक्षकेतर उपाशीपोटी सेवा देत आहेत. परंतु मागील शासन व सध्याच्या शासनाने त्यांना न्याय दिले नाही. यासाठी त्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने शिक्षक आ. नागो गाणार व शिक्षण उपसंचालकांची भेट घेवून आपल्या समस्या सांगितल्या.मागील पाच वर्षांपासून मूल्यांकण प्रक्रिया आणली आहे. आॅन लाईन मूल्यांकणानंतर जिल्ह्यातील शाळा आॅनलाईनसाठी पात्र असल्यावरही शासनाने त्रयस्त समितीचे गठन करून शाळांचे मूल्यांकण केले. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीद्वारे मुंबई व नागपूर अधिवेशनात मोर्चा व धरणे करण्यात आले. त्यावर शासनाने १७ मार्च २०१५ रोजी त्रयस्त समिती रद्द केल्याचे पत्र काढले. परंतु आतापर्यंत कसलेही अनुदान देण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. जिल्ह्यातील नऊ शाळा आॅन लाईन पात्र असल्यावरही अनेकवेळा मूल्यांकण प्रस्ताव मागविले जातात. संस्था संचालक व शाळेचे कर्मचारी गोंदिया, नागपूर, पुणे, मुंबईचे चक्कर मारतात. मात्र त्यांना सकारात्मक उत्तरे मिळत नाही. पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यानंतरही वेळोवेळी त्रुट्या दाखवून पुन्हा प्रस्ता सादर करावयास सांगितले जाते. आज नाही उद्या आपले भले होणार या आशेने कर्मचारी काम करीत आहेत. काहींची वय सेवानिवृत्तीपर्यंत पोहचली आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हा विना अनुदानित कृती समितीचे अध्यक्ष पी.डब्ल्यू. भोवते, महासचिव सुनील मेश्राम, कोषाध्यक्ष प्रमोद चौरागडे, दीपक डोंगरे, वी.सी. गजभिये आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आमदार नागो गाणार यांची भेट घेवून आपल्या समस्या सांगितल्या. यावर शिक्षक आमदार नागो गाणार यांनी लवकरच पात्र शाळांना आर्थिक तरतूद करून अनुदान मिळवून देवू व ज्या शाळांना वेळोवेळी वेळोवेळी प्रस्ताव सदार करावयास सांगितले जाते, त्या सर्व शाळांचे नाव पात्रता यादीत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सदर प्रतिनिधी मंडळ शिक्षण विभाग नागपूरचे उपसंचालक अनिल पारधी यांची भेट घेवून समस्या कथन केल्या. त्यांनीही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)