गोंदियामध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 12:12 IST2018-12-30T12:09:25+5:302018-12-30T12:12:41+5:30

गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी (30 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

two people killed in accident in gondia | गोंदियामध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

गोंदियामध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

ठळक मुद्देगोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी विद्युत प्रकल्पाच्या गेट क्रमांक तीनसमोर हा अपघात घडला.  

गोंदिया - गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी (30 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.  या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी विद्युत प्रकल्पाच्या गेट क्रमांक तीनसमोर हा अपघात घडला.  

मिळालेल्या माहितीनुसार,  दुचाकीस्वार हे तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथील असून ते गुमाधावडावरून जमुनिया येथे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मृतक पती पत्नीची नावे अद्याप कळू शकली नाही. दरम्यान तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहचत कारचालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: two people killed in accident in gondia