शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दोन घटनांत ८.५० लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: April 27, 2015 00:38 IST

तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांचे दागिने तर सालेकसा येथील सराफा दुकान फोडून

सराफा दुकान फोडले : पाहुण्यांचे दागिने केले लंपास गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांचे दागिने तर सालेकसा येथील सराफा दुकान फोडून अशा दोन घटनांत चोरट्यांनी आठ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथून अज्ञात चोरट्यांनी मंगळवार ते बुधवार दरम्यान चार लाख २६ हजार ८०० रूपयाचा माल पळविण्यात आला.वडेगाव निवासी अनंत जायस्वाल यांच्या घरी लग्न समारंभासाठी गणेश जियालाल जायस्वाल (६२, परासिया, मप्र) पत्नी सुशीला व साळी लक्ष्मी यांच्या सोबत आले होते. त्यांचे दागिने सुटकेसमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी मंगळवार ते बुधवार दरम्यान दरवाजे उघडे असल्याचे संधी साधून त्यांच्या सुटकेश मधील सदर दागिणे लंपास केले. चोरीच्या गेलेल्या दागिन्यांमध्ये ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कंगण किंमत एक लाख ३० हजार, ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र किंमत एक लाख ३० हजार, ४० ग्रॅम वजनाचा लांब हार किंमत एक लाख चार हजार, १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत २६ हजार, आठ गॅ्रम वजनाचे दोन नग सोन्याचे टाप्स किंमत १३ हजार, चांदीच्या तोरड्या व बिछीया किंमती ३०० रूपये असा एकूण चार लाख २६ हजार ८०० रूपयांचा माल आहे. तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत, शनिवारी रात्री दरम्यान सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत दरेकसा रस्त्यावरील लक्ष्मीप्रसाद सोनी यांच्या सराफा दुकानाच्या शटरला गठ्ठा करून कडी काढली व दुकानातून चार लाख २४ हजार ९१६ रूपये किंमतीचे दागिने व पाच हजार रूपये रोख पळवून नेले. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी सालेकसा येथील एक अधिकारी व एक कर्मचारी आमगाव पोलीस ठाण्यात आले होते.सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी त्यांनी रात्रीच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. (तालुका प्रतिनिधी)