शिकारीसाठी जाणाऱ्या दोन आरोपींना अटक

By Admin | Updated: March 30, 2016 02:07 IST2016-03-30T02:07:21+5:302016-03-30T02:07:21+5:30

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील कोकणा परिसरात ८ ते १० लोक गावठी कुत्र्यांसह हातात कुऱ्हाड व काठ्या घेऊन शिकारीसाठी जात असतानाच...

Two accused going to the killings arrested | शिकारीसाठी जाणाऱ्या दोन आरोपींना अटक

शिकारीसाठी जाणाऱ्या दोन आरोपींना अटक

सहा फरार : राष्ट्रीय उद्यानात गस्ती पथकाची कारवाई
नवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील कोकणा परिसरात ८ ते १० लोक गावठी कुत्र्यांसह हातात कुऱ्हाड व काठ्या घेऊन शिकारीसाठी जात असतानाच त्यांना रात्री ११ वाजता वन्यजीव विभागातील गस्ती पथकाने अटक केली. मात्र त्यापैकी २ लोकांनाच अटक करण्यात यश आले असून ६ जण फरार झाले. त्यांची नावे कळाली असून त्यांना हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
सदर लोक शिकारीसाठी जात असल्याचे कळल्यानंतर गस्ती पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तिकडे मोर्चा वळविला. यावेळी आरोपींनी प्राणघातक हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्या ८ आरोपींमधून पुरूषोत्तम उरकुडा कोहळे (५०), भोजराम लक्ष्मण मडावी (४९) यांना पकडण्यात यश आले. उर्वरीत सहा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
पसार झालेल्या आरोपीमध्ये भागवत अर्जुन कुभरे, सेवक शिवाजी कोहळे, देवदास धनराज गजबे, कैलास मनोहर मुरखे व धनराज भागवत डोंगरवार यांचा समावेश आहे. सदर आरोपी वांगी येथील आहेत. त्यांच्यावर वन्य (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, २७ (१), ३१, ५० (१), ५१ व ३५ (६) अन्वये कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी गिता पवार, वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एम.व्ही.पाटील, डी.डी.मेश्राम, नवघरे, भदाने, नागपुरे, जोशी व सूर्यवंशी यांनी केली. अटकेत असलेल्या दोन आरोपींना ७ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.(वार्ताहर)

Web Title: Two accused going to the killings arrested