शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

पर्यटन संकुलाचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:00 AM

पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग पर्यटन विकास महामंडळ एवढे विभाग या पर्यटन संकुलाशी निगडीत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । रोजगार निर्मितीचे स्वप्नच : वन्यजीव विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाचा विकास रोजगार निर्मितीच्या उद्देशाने केल्यास हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सध्या हे संकुल वन्यजीव संरक्षण विभागाकडे व्यवस्थापनासाठी दिले आहे.मात्र या विभागाकडून संकुलाच्या विकासासाठी आत्तापर्यंत कुठलेही पाऊले उचलण्यात आले नाही. त्यामुळे पर्यटन संकुलाला वाळवंटाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.जिल्ह्यासाठी वैभव असलेल्या पर्यटन संकुलाच्या योग्य संवर्धनाअभावी बारा वाजले आहे.पर्यटनातून रोजगाराची निर्मिती हे उद्दिष्ट समोर ठेऊन केंद्र व राज्य शासन कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवित आहे. त्याच धर्तीवर या पर्यटन संकुलाचा विकास करण्यासाठी स्थानिक वन समितीला व्यवस्थापनासाठी द्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने शासनाला अनेकदा करण्यात आली. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षीतपणामुळे या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वनविभाग गोंदियाच्या वतीने चार वर्षापूर्वी वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी समितीकडे अखर्चित पडून आहे.७ कोटी रुपयाचे मंजूर झालेली कामे अद्यापही सुरु झाले नाही. समितीने जवळपास १०० बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले आहे. हे सर्व प्रशिक्षीत युवक-युवती रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत.पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग पर्यटन विकास महामंडळ एवढे विभाग या पर्यटन संकुलाशी निगडीत आहेत. बैठकीत व समितीच्या पदाधिकारी सदस्यांना आत्तापर्यंत अनेकदा आश्वासने देण्यात आली.पण त्याची अद्यापही पुर्तता करण्यात आली नाही.त्यामुळे समितीचे पदाधिकारी व सदस्य संतप्त झाले आहेत.पर्यटनस्थळांची दुरवस्थाशासनाच्या पर्यटन धोरणानुसार या पर्यटन संकुलात विश्रामगृहे, बालोद्यान, उपहार गृह, हिलटॉप गार्डन, हॉलीडे होम्स गार्डन, तंबू निवास, नौका नयन, संजय कुटी परिसर व विश्राम गृह, नवेगावबांधचा नयनरम्य व निसर्ग सौंदर्याची उधळण करणारे जलाशय, विकासाच्या व पुनर्रजीवनाच्या प्रतिक्षेत असलेले मनोहर उद्यान रॉक गार्डंन आदी पर्यटन स्थळांचा संकुलात समावेश आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बिकट अवस्था झाली आहे.बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षानवेगावबांध येथील पर्यटन संकुलातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी प्रशिक्षण घेतलेले ५० बेरोजगार युवक-युवती रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.वन्यजीव संरक्षण विभाग, वनविभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जर पर्यटन संकुलाच्या विकासाची तळमळ असती तर या संकुलाचा कायापालट होण्यास व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागला नसता.

टॅग्स :tourismपर्यटनNavegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य