शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

धनत्रयोदशीला गोंदियात कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 21, 2014 22:52 IST

धनत्रयोदशी, अर्थात धनसंचय करण्याचा दिवस. या दिवशी सोन्या-चांदीसह भांड्यांची खरेदी केल्याने घरात समृद्धी नांदते अशी भावना आहे. त्यामुळे गोंदिया शहरासह जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिकांची

गोंदिया : धनत्रयोदशी, अर्थात धनसंचय करण्याचा दिवस. या दिवशी सोन्या-चांदीसह भांड्यांची खरेदी केल्याने घरात समृद्धी नांदते अशी भावना आहे. त्यामुळे गोंदिया शहरासह जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिकांची दुकाने मंगळवारी चांगलीच गजबजून गेली होती. एकट्या गोंदिया शहरात ५ कोटी रुपयांच्या सुवर्ण आणि चांदीच्या दागिने व वस्तूंची खरेदी नागरिकांनी केली. तसेच भांडी आणि इतर वस्तू मिळून १० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल मंगळवारी गोंदियात झाली.भांड्यांच्या खरेदीसाठीही महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. घरात उपयोगी पडणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तूंच्या खरेदीकडे महिलांचा कल होता. त्यात स्टिलच्या भांड्यांसह तांब्याच्या आणि पितळी भांड्यांनाही बऱ्यापैकी मागणी असल्याचे गोंदियातील दुकानदारांनी सांगितले. दररोज भांड्यांची विक्री जेवढी होते, त्यापेक्षा १५ ते २० टक्के विक्री अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर प्रत्येक भांड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी दिसत होती. ही गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. सुवर्ण बाजारात तर अनेक दुकानांमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता. सोन्याचा दर मंगळवारी २४ कॅरेटसाठी २८,००० रुपये तोळा तर २३ कॅरेटसाठी २६,९५० रुपये प्रतितोळा होता. हाच दर गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रतितोळा १ हजार रुपयांनी कमी होता. मात्र मंगळवारी दर जास्त असतानाही लोकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधन खरेदीसाठी झुंबड केली. यासोबतच चांदीचा दर ४० हजार रूपये किलो असा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत चांदी स्वस्त झाल्यामुळे चांदीच्या वस्तू खरेदीकडेही नागरिकांचा कल दिसून आला. (जिल्हा प्रतिनिधी)