शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी गावातून जड वाहतूक बंद करा

By admin | Updated: August 12, 2014 00:01 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुुनी येथील वैनगंगा नदीच्या रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले. या नदी घाटावरून रेती काढण्यासाठी व रेतीची वाहतूक करण्यासाठी अर्जुनी गावातून रात्रंदिवस मोठ्या

इंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील अर्जुुनी येथील वैनगंगा नदीच्या रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले. या नदी घाटावरून रेती काढण्यासाठी व रेतीची वाहतूक करण्यासाठी अर्जुनी गावातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे गावातील रस्ता पूर्णत: उखडला आहे. गावातून जड वाहतूक बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याच रस्त्यावर हायस्कूल व प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची धावपळ नेहमीच सुरु असते. गावातील रस्ता अरूंद आहे व या रस्त्यावर एकामागे एक पाच ते सात मोठ्या टिप्परची ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांनासुध्दा फार त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांमुळे पूर्ण रस्ता उखडला असून रस्त्याच्या बाजूला व रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्ता एकेरी वाहनांच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंतु या रस्त्यावरून रेतीच्या जड वाहनांमुळे पूर्ण रस्ता तुटका व खड्डेमय झाला आहे. यात विद्यार्थी व नागरिकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच रस्त्यावरून अर्जुनी-सावरा-पिपरिया बससुध्दा चालत आहे. यात रेतीचे ट्रक आल्यास या रस्त्यावरून बस धावणे कठीण होत असून केव्हाही अपघात होऊ शकतो. ग्रामपंचायतला माहिती असूनसुध्दा ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांनी डोळे बंद करून आंधळ्याचे सोंग घेतले आहे. पिपरिया वैनगंगा नदीच्या रेतीघाटाचे लिलाव रद्द करून जड वाहनांची वाहतूक थांबवावी, अशी आग्रही मागणी येथील ग्रा.पं. सदस्य किरण सुरजलाल साठवणे यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन चौकशी करावी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)