शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नळ ओकताहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:53 IST

पाण्यासाठी एकीकडे हयहाय सुरू असताना तिरोडा शहरात नळांद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

गोंदिया : पाण्यासाठी एकीकडे हयहाय सुरू असताना तिरोडा शहरात नळांद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे तिरोडावासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र सपशेल दुर्लक्ष आहे. गोंदियानंतर महत्त्वाचे शहर म्हणून तिरोडा शहराची ओळख आहे. अदानी वीज प्रकल्पासह तिरोडा तालुक्यात धापेवाडा सिंचन योजना आहे. शिवाय पाणी टंचाईच्या काळात बावणथडी प्रकल्पातून वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे तिरोडा शहरात साधारणत: पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकत नाही. असे असतानाही आजघडीला शहरातील नळ मात्र गढूळ पाणी ओकत आहेत. तिरोडा शहरातील शहीद मिश्रा वॉर्डमध्ये शनिवारी सकाळी नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. सुरूवातीला १५ मिनिटे नळांना स्वच्छ पाणी आले. मात्र त्यानंतर अत्यंत गढूळ पाणी नळांतून निघू लागले. हे पाणी लालसर रंगाचे अत्यंत गढूळ असून ते पिण्यायोग्य नव्हते. शिवाय हे पाणी भांडीकुंडी व कपडे धुणे याशिवाय इतर कामांसाठीही उपयोगी नव्हते. अशात असे गढूळ पाणी तिरोडावासीयांना नळाद्वारे मिळत आहे. शहरात आधीच पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अनेक वॉर्डातील नळांना पाणी येत नाही. काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन असल्यामुळे संतुलित प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. संबंधित विभागाने त्या जुन्या पाईप लाईन काढून नवीन पाईप लाईन घातल्या नाही. तर दुसरीकडे ज्या वॉर्डांत पिण्याचे पाणी नळांना येत आहे, तेथे गढूळ पाणी पुरविले जात आहे. या प्रकाराकडे त्वरित लक्ष पुरवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा तिरोडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच असे झाल्यास यासाठी सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरण्यात येईल, असा इशारा तिरोडावासीयांनी दिला आहे. (प्रतिनिधी)