भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:12 IST2018-12-06T22:12:09+5:302018-12-06T22:12:31+5:30
धान चुराई मशीन घेऊन जात असलेल्या ट्रॅ्क्टरला मागून येत असलेल्या ट्रकने भिंडत होऊन घडलेल्या अपघातात टॅक्टरच्या चालकासह दोघे जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत.

भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : धान चुराई मशीन घेऊन जात असलेल्या ट्रॅ्क्टरला मागून येत असलेल्या ट्रकने भिंडत होऊन घडलेल्या अपघातात टॅक्टरच्या चालकासह दोघे जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील भर्रेगाव फाट्याजवळ बुधवारी (दि.५) रात्री ११.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. यातील मृत ट्रॅक्टर चालक मोरेवर हनु येल्ले (४४) व सवार सोमेश्वर माणिक उईके (५५,रा.आमगाव आदर्श ) असे आहे.
सविस्तर असे की, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-ए ८९३१ धान चुराईची मशिन घेऊन बुधवारी (दि.५) रात्री ११.३० वाजतादरम्यान सिरपूरबांधकडे जात असताना मागून भरधाव येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच २३-एयु ४००५ ने ट्रक्टरला जबर धडक दिली. या धडकेत धान चुराई मशीनसह ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उलटला. या अपघातात ट्रॅक्टर चालक मोरेश्वर येल्ले व सवार सोमेश्वर उईके जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले नरेश योगराज जोशी (२३), अमृत जिवन येल्ले (२२), महेश रूपचंद उईके (२५), हेमराज देवेंद्र येल्ले (२५) व ज्ञानेश्वर देवेंद्र येल्ले (२४,रा.आमगाव आदर्श) हे जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.