गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उलटला ! मुरदोली वाघदेव मंदिराजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:01 IST2026-01-03T19:01:14+5:302026-01-03T19:01:51+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली : गॅस गळतीच्या भीतीने दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविली

Truck carrying gas cylinders overturns! Incident near Murdoli Waghdev Temple
गोंदिया : गोंदियाहून सीएनजी गॅस सिलिंडर खालीकरून कोहमाराकडे जात असलेल्या सीएनजीवरील ट्रक मुरदोलीजवळील वाघदेव मंदिराजवळ उलटले, ही शनिवारी (दि.३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. सीएनजी गॅसची गळती होण्याची शक्यता लक्षात
घेता खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया-कोहमारा मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक जवळपास दोन तास पुर्णपणे थांबविण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार शनिवारी सायंकाळी गोंदियाहून सीएनजी सिलिंडर खालीकरुन ट्रक कोहमाराकडे जात होता. दरम्यान हा ट्रक सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोलीजवळ वाघदेव मंदिराजवळ उलटला. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव आणि डुग्गीपार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक सीएनजीवर चालणारा असल्याने त्यातील टँकमधून गॅस गळती होवून स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गावरील दोन्ही बाजुकडील वाहतूक
पोलिसांनी थांबवून ठेवली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत सीएनजी सिलिंडरमधील गॅस पूर्णतः संपत नाही. तोपर्यंत रस्त्यावर उलटलेला सीएनजीच्या ट्रक रस्त्यावरुन बाजुला करणे शक्य नसल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. वृत्त लिहेपर्यंत क्रेन मागवून रस्त्यावर उलटलेला ट्रक हटविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशीरापर्यंत सुरु होती.