शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवक-युवतींनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:35 IST

माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता ...

सहषराम कोरोटे : धुर्व गोंड समाजाची १७ जोडपी विवाहबद्धदेवरी : माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरिता रोजगाराच्या शोधात इतरत्र कुठेही न भटकता आदिवासी समाजातील युवक-युवतींनी गावातच लहान-लहान लघु उद्योग उभारावे. आपले आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावे. आपण स्वत: आत्मनिर्भर झालो तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आपला आदिवासी समाज हा प्रगतीपथाकडे वाटचाल करेल. एक विकसीत समाज म्हणून लोक आपल्या समाजाकडे पाहतील. यासाठी आपल्या समाजाचा सर्वांगिण विकास आणि समाजाची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर आदिवासी समाजातील युवक-युवतींनी लहान लघु उद्योग सुरू करून स्वयंरोजगाराकडे आपली वाटचाल करावी, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले. ते शनिवार (दि.२२) देवरी तालुक्यातील धामनझोरी-धमदीटोला (घोनाडी) येथे पार पडलेल्या आदिवासी धुर्व गोंड समाजाच्या १७ जोडप्याच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते. उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी दीप प्रज्ज्वलन ओराडबांधचे समाज महासभाचे अध्यक्ष धन्नुलाल उईके यांनी केले. धुर्व समाज धमधागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, जि.प. सदस्य अलताफ हमिद, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, उपाध्यक्ष धनपत भोयर, अमित विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. रामटेके, सरपंच अंतकला वाढई, ग्रा.पं. सदस्य उदाराम धानगाये, माजी उपसभापती इंदल अरकरा, सुधाकर कोकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश राऊत, समाजाचे जिल्हा सचिव राधेलाल सलामे, जिल्हा सदस्य रामेश्वर पदाम यांच्यासह गावागावातून शेकडोच्या संख्येत आदिवासी समाजातील महिला पुरुष व युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी १७ विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांना मंगलमय सांसारिक जीवनाच्या त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. कोरोटे पुढे म्हणाले, आजच्या दैनंदिन महागाईच्या जीवनकाळात आदिवासी समाजातील लोकांना आपले श्रम, धन व वेळेची बचत करायचे असेल तर आपल्या मुलामुलींचे लग्न अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यात करावे. ही आजच्या काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान आ. संजय पुराम, एम.डी. ठाकूर, धन्नुलाल उईके, इंदल अरकरा, भरतसिंग दुधनाग, हरिचंद उईके आदींनी उपस्थितांना समायोजित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक माजी पं.स.सदस्य सोनू नेताम यांनी मांडले. संचालन पंचराम मडावी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)