क्वारंटाईन कक्षालगतच दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:27+5:30

बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली. क्वारंटाईन झालेल्या लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कुडवाच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात दाखल केले जाते. ज्या व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले त्या रूग्णांना उपचारासाठी गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यासाठी चार वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली.

Treatment on two positive patients beside the quarantine room | क्वारंटाईन कक्षालगतच दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार

क्वारंटाईन कक्षालगतच दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार

Next
ठळक मुद्देसंसर्ग होण्याची शक्यता : मेडिकलचे कोरोनाचे रूग्णांचे चार वॉर्ड रिकामेच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा उपचार करण्यासाठी गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये चार वॉर्ड तयार करण्यात आले. परंतु ते चारही वॉर्ड रिकामे असूनही क्वारंटाईन लोकांसाठी असलेल्या क्रीडा संकुलातील कक्षा लगतच दोन पॉझिटिव्ह रूग्णांना ठेवण्यात आल्याने क्वारंटाईन असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याची दखल कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली. क्वारंटाईन झालेल्या लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कुडवाच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात दाखल केले जाते.
ज्या व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले त्या रूग्णांना उपचारासाठी गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यासाठी चार वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी (दि.१९) रोजी गोंदिया जिल्ह्यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अहवाल येताच त्या दोन्ही रूग्णांना मेडिकल कॉलेजमध्ये हलविणे अपेक्षीत होते. परंतु आरोग्य प्रशासनाने त्या पॉझिटिव्ह रूग्णांना क्वारंटाईन असलेल्या १०६ लोकांच्या सानिध्यातच ठेवले आहे. तिन प्रकारची व्यवस्था म्हणून आधीपासून तयारी करण्यात आली. परंतु पॉझिटिव्ह रूग्णांना मेडिकल कॉलेजमध्ये न हलविल्याने क्रीडा संकुलात असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी अधिक बोलणे टाळले.

डॉक्टर व कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी जाण्यास बंदी घाला
क्रीडा संकुलात ज्या डॉक्टरांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली ते त्याही ठिकाणी काम करतात शिवाय इतर आरोग्य संस्थेकडेही धाव घेतात. त्यामुळे क्रीडा संकुलातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर आरोग्य संस्थेत किंवा बाहेर फिरण्यास मनाई करण्यात यावी असा सूर इतर आरोग्य संस्थामधील कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
वॉर्ड तयार स्टॉप तयार मग दिरंगाई का?
कोरोना रूग्णांचा उपचार करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये चार वॉर्ड स्वतंत्र तयार करण्यात आले.त्यासाठी स्टॉपही नेमण्यात आला. परंतु त्या ठिकाणी कोरोना रूग्णांना दाखल करण्यात आरोग्य विभाग का तयार नाही हे न समजण्यासारखे आहे.

Web Title: Treatment on two positive patients beside the quarantine room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.