शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे राज्य मार्गावर अतिक्रमण

By admin | Updated: December 16, 2014 22:55 IST

अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे.

गोंदिया : अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे.
गोंदिया शहरातील मार्ग म्हणजे व्यवसायिकांच्या वहिवाटीची जागा ठरली आहे. यामुळेच वाहनधारकापुढे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु वाहतूक विभाग व परिवहन विभाग दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. गोंदिया-आमगाव राज्य मार्गी ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचे अतिक्रमण आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ट्रान्सपोर्ट व्यावसायीक जड वाहने दिवसभर उभे करून ठेवतात. राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूला उभ्या वाहनांची रांग राहत असल्यामुळे हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गावर होत असलेल्या वाहतूक नियमांचा उल्लंघनावर कारवाई करणे आव्हाण ठरले असतांना सबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे श्रीमंत व्यवसायिकांच्या दारी वाहतूक नियम गहाण ठेवण्यात आले काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोे.
गोंदिया व जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय असून ग्रामीण भागातील नागरिकांसह तालुक्यातील जनतेचा विविध कामानिमित्त अनेक कार्यालयाशी दैनंदिन सबंध येतो. यामुळे या मार्गावरून नेहमीच वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या मार्गाने देवरी पासून ते गोंदिया पर्यंत असणाऱ्या गावातील नागरिकांची ये-जा रात्र व दिवस सुरू असते. याशिवाय कोहमारा, सडक/अर्जुनी, गोरेगाव या राज्यमार्गाने येणाऱ्या प्रवाशांनाही आमगावकडे जाण्याकरिता फुलचूर नाका ओलांडून याच मार्गाने जावे लागते.
दरम्यान फुलचूर नाक्यासमोर काही अंतरावर गोंदिया- आमगाव या मार्गावर ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी जड वाहने उभी असतात. यामुळे या मार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीस रस्ता कमी पडत आहे. याचा त्रास वाहनचालकांना सहन करून घ्यावा लागतो. या मार्गावर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांचे कार्यालय आहे.
यामुळे या महत्वपूर्ण कार्यालयात जनतेची अनेक कामे असतात. दिवसभर या मार्गाने खाजगी वाहने त्याचप्रमाणे एसटी बसगाड्या, काळी-पिवळी गाडी, तिनचाकी आॅटो, दुचाकी गाड्या सारखी वाहने धावत असतात. जिल्हा परिषद मधील काही महत्वपूर्ण कामे त्वरीत करून घेण्याच्या दृष्टीने वाहनचालक अतिवेगाने गाडी चालवित असताना रस्त्यावर दोन्ही कडेला उभी, असलेली जड वाहनांवर अनवधानाने छोटे वाहन आदळल्यास जिवीतहाणी होऊन मृत्यूला आमंत्रण देण्याची पाळी वाहनचालक व प्रवाशांवर येऊ शकते. पर्यायाने या घटनेत अनेकांचा जीव जाऊ शकतो. वाहतूक विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे.
गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील बऱ्याच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. फुलचूर नाक्याजवळ वाहतूक पोलीस नेहमीच चारचाकी वाहनांची पोलीस नेहमीच चारचाकी वाहनांची तपासणी करीत असतात. मात्र या ठिकाणाहून जवळच असलेल्या गोंदिया- आमगाव मार्गावर ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी मोठमोठी जड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी ठेवली असताना ती हटविण्यात येत नाही. यामुळे या मार्गावरील वाहनधारक प्रवाशांची चांगलीच कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी लक्ष देतील काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)