शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

सहा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप

By admin | Updated: November 18, 2015 01:57 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील कृषी विभाग विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात लाखांचे धनादेश वितरितबोंडगावदेवी : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील कृषी विभाग विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे. अर्जुनी-मोरगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुक्यातील गावपातळीवरच्या सामान्य शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१४-१५ अंतर्गत तालुक्यातील २ महिलांसह सहा शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावे, त्यांच्या कुटुंबामध्ये नवचैतन्याची पहाट उजळावी, कर्जाच्या बोज्यातून मुक्तता व्हावी यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यशासन विविध योजना पॅकेज जाहीर करते. आदिवासी तालुका अर्जुनी-मोरगाव विकासापासून कोसो दूर राहत असल्याचे दिसत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नाने कृषी विभागाच्या विविध लोकोपयोगी योजना तालुक्यातील शेवटच्या टोकासह गावखेड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविल्या जातात. शेतकरी धानाव्यतिरिक्त इतर नगदी उत्पादन देणारी पिके घेण्यासाठी पुढे आल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर कृषी अवजारे सहजरित्या उपलब्ध करून देऊन आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कृषी उत्पादनात भरघोष वाढ होण्याच्या हेतूने तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना थेट लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरून दिसत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर घेण्यासाठी महिला शेतकऱ्यांंना १.२५ लाख तर पुरूष शेतकऱ्यांंना एक लाखाचे अनुदान ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी दिला जातो. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला १० ट्रॅक्टरचे उद्ष्टि होते. तालुक्यातील सात शेतकऱ्यांच्या प्रस्तावांचे आठ लाखांचे धनादेश महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ लि. नागपूरला देण्यात आले. त्या अनुषंगाने तालुक्यातील कमला श्रीधर लंजे, मंगला जयदेव कापगते, अशोक लंजे, शामराव मस्के, भागवत लंजे, भीमसेन डोंगरवार या शेतकऱ्यांना साकोली येथून आयसर ३३३ ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी पर्यवेक्षक बी.टी. राऊत तसेच लाभार्थी शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित शेतकऱ्यांंना येत्या काही दिवसांत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले आहे. (वार्ताहर)