शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भजनाने काढली गावात शाळाप्रवेश दिंडी

By admin | Updated: June 30, 2017 01:28 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. काही

पिंडकेपार/दे. येथील नाविण्यपूर्ण उपक्रम : विद्यार्थ्यांचे केले स्वागत व पुस्तक वितरण लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. काही गावांत शिक्षणाच्या जनजागृतीसाठी प्रवेश दिंडी काढून पालकांत जागृती करण्यात आली.तर काही गावांत शाळेतच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र तालुक्यातील पिंडकेपार/दे. येथे भजनाने प्रवेश दिंडी काढण्यात आली. पिंडकेपारवासीयांच्या या नावीण्यपूर्ण उपक्रमाचे परिसरात कौतूक केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवासाठी ग्रामीण भागातील काही शाळांनी विद्यार्थ्यांची रॅली काढली. काही शाळांत गावचे पदाधिकारी व विद्यार्थी गावात घोषवाक्य देत निघाले. अशा वेगवेगळ््या प्रकारच्या दिंड्या काढून पालकांत जनजागृती व विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र पिंडकेपार/दे. येथील गावकऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवून प्रवेशोत्सवाचा आगळावेगळाच प्रयोग करून दाखविला. पिंडकेपार/दे. येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नाविण्यपूर्ण उपक्रमाने दिंडी काढण्यात आली. सर्वात अगोदर नवागतांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या निरंकारी भजन मंडळ व दुर्गाबाई भजन मंडळ यांच्या संयुक्तवतीने गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली. टाळ व ढोलकीच्या तालावर भजन गात भजनी गावात निघाले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. एकच ध्यास गुणवत्तेचा विकास यावरील भजनाने विद्यार्थी दंग झाले होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना सरपंच प्रमिला घासले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्पना बागडे, उपाध्यक्ष पदमा राऊत, केंद्र प्रमुख इ.न.येळणे, कवडू कोल्हारे, सुखराम नाईक, यशवंत बागडे, शिवलाल राऊत, शाराजा कोल्हारे, अंजिरा धानगाये, कौशल्या धानगाये, भागरता येल्ले, मालती कोल्हारे, शारदा बावणे यांच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेशसिंह कश्यप यांनी मांडले. संचालन यशवंत टेंभुर्णे यांनी केले. आभार चेतन उईके यांनी मानले.