शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जिल्ह्यात बालस्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 13, 2014 23:04 IST

स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी,

गोंदिया : स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी, उपस्थिती, उपक्रमातील सहभाग व दर्जेदार शिक्षणात सकारात्मक बदलाच्या भूमिकेतून केंद्र सरकारच्या आदेशान्वये १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व मुख्यकार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसरामुळे प्रफुल्लित वातावरण निर्माण होऊन बालकांमध्ये आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजतील. आजारांचे प्रमाण कमी होईल, तसेच राष्ट्र विकासात व आर्थिक वृद्धीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करुन घेऊन त्यांच्या मतदारसंघात बालस्वच्छता मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व मुख्य कार्यकारी अधिकाहरी डी.डी. शिंदे यांनी दिली.बालस्वच्छता मोहिमेंतर्गत दि. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत १४ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, क्रिडांगणे या ठिकाणच्या स्वच्छतागृहांची पाहणी व उद्घाटन करुन सर्व मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत सांगून स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ देऊन शालेय स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आपे आहे. १५ नोव्हेंबर रोजी स्वच्छता व स्वच्छ आंगणवाडी उपक्रमांतर्गत शालेय परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी मुख्याध्यापक मोहिमेचे व परीसर स्वच्दतेचे महत्व सांगणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी वैयक्तिक स्वच्दता आणि बाल आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबरला स्वच्दता अन्न दिवस साजरा करण्यात येऊन या अंतर्गत आरोग्य केंद्रास भेट देऊन आहार व आरोग्याची माहिती देण्यात येणार आहे. १८ रोजी पाण्याबाबत उद्बोधन, जलशुद्धीकरण केंद्रास भेट, पाणी स्वच्छतेचे स्टीकर तयार करणे, शाळेतील पाण्याच्या टाकीची स्वच्छता, अशुद्ध पाण्याचे परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १९ रोजी जागतिक शौचालयादिनी शौचालयाचा वापर व स्वच्दतेबाबत उद्बोधन, स्वच्छतागृह कसे असावे यावर चर्चा घडवविण्याच्या उपक्रमांचा समावेश आहे.उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये बालकांना प्रोत्साहित व प्रेतिर कयन त्यांच्यामार्फत आसपासच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छताविषयक संदेश पोहचविण्यासाठी त्यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली जाणार आहे. प्रत्येक बालकास तीन ते चार कुटुंबांना भेटी देऊन त्यामधील सदस्यांना स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा याबाबत माहिती देण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. स्वच्छ भारताचे ध्येय साधण्यासाठी सुरु होत असलेल्या बाल स्वच्छता मोहिमेला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व सीईओ डी.डी. शिंदे यांनी केले आहे.