शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पात सहाच वाघांचे दर्शन

By admin | Updated: May 8, 2015 01:00 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विविध बीटमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या २४ तासात करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत केवळ सहा वाघ आढळले.

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विविध बीटमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या २४ तासात करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत केवळ सहा वाघ आढळले. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या वाढली असली तरी काही दिवसांपूर्वी कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आढळलेल्या संख्येपेक्षा ही संख्या कमी असल्याने कोणती संख्या खरी असा प्रश्न निर्माण झाला आहे.४-५ मे रोजी करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी २२६ मचान तयार करण्यात आले होते. जिथे पाण्याचे स्त्रोत आहे त्या ठिकाणच्या ५० मीटरच्या आसपास हे मचान बनविण्यात आले होते. तसेच वन्यजीवांच्या गणनेत सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर व आलापल्ली येथील अशासकीय संस्थेचे सदस्य आले होते. एकूण २५४ वन्यजीव प्रेमी या अभियानात सहभागी झाले होते. यात २२३ पुरूष तर ३१ महिलांचा समावेश होता.विशेष म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्याची संपूर्ण तयारी वन विभागाने केली होती. परंतु त्या रात्री अचानक आकाश ढग जमा झाले व त्यामुळे वन्यप्राण्यांची गणना प्रभावित झाली. शक्यतो अनेक वन्यजीव त्या रात्री जलस्त्रोतांजवळ पोहचले नाही, असे सांगितले जात आहे. जर वन्यप्राणी जलस्त्रोतांजवळ आलेही असतील तरी ढगाळलेल्या वातावरणाचा अंधार असल्यामुळे त्यांची गणना होवू शकली नाही. यात प्रामुख्याने सहा वाघ आढळले. यातील दोन उमरझरी, एक पिटेझरी, दोन नागझिरा व एक बोंडे वनपरिक्षेत्रात आढळला. ४५ बिबटसुद्धा आढळले. २४७ रानटी कुत्रे, १७२ अस्वल, दोन चांदी अस्वल, एक हजार २२४ रानगवे, एक हजार ४०६ चितळ, ४४६ सांभर, ५९७ निलगाय, २० चौसिंगे, १५६ भेकर, एक हजार ४४४ रानडुक्कर, २४० मोर, २९ मुंगूस, ४४५ मॅक्यूई, चार हजार ७५६ वानर, आठ पॉरक्युपाईन, १६ रानमांजर यांचा समावेश आहे.उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी केवळ चारच वाघ आढळले होते. यात दोन नागझिरा अभयारण्यात, एक न्यू नागझिरा अभयारण्यात व एक कोका अभयारण्यात होते. बिबट्यांची संख्या ४२ होती. ही संख्या यावर्षी वाढली. अस्वल २०१, रानगवे एक हजार २८१, सांभर ५४७, चितळ एक हजार ४११, रानडुक्कर एक हजार ३९६, लाल तोंडाचे वानर ४६२, निलगाय ५६९, मुंगूस १२, मोर ३२३, रान कुत्रे ४०५, रान मांजरी ९, चौशिंगा १८, वानर तीन हजार ८८९ आढळले होते. मागील वर्षी १४ मे रोजी झालेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत एकूण १० हजार ७६१ वन्यप्राणी आढळले होते. यावर्षी ही संख्या वाढून ११ हजार २७५ झाली आहे. (प्रतिनिधी)सात बीटमध्ये वन्यप्राणी गणनानवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात एकूण सात बिटमध्ये (रेंज) वन्यप्राण्यांची गणना ४-५ मे २०१५ रोजी करण्यात आली. यात कोका येथे ९२९ वन्यप्राणी, उमरझरी येथे ७८०, पिटेझरी येथे एक हजार ४१७, नागझिरा येथे चार हजार ७८१, नवेगाव राष्ट्रीय उद्यानात दोन हजार ४०५, डोंगरगाव येथे ५४३ व बोंडे येथे ४२० अशी एकूण ११ हजार २७५ वन्यप्राण्यांची नोंद बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या प्रकाशात वन कर्मचारी व वन्यजीव प्रेंमीकडून करण्यात आली.