गोंदिया : पाणी आणि शिकारीच्या शोधात तोंडी नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १२) तिरोडा तालुक्यातील सर्रा माल्ही येथे उघडकीस आली. दरम्यान या वाघाचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला असा अंदाज वाघाच्या मृतदेहावरून वर्तविला जात आहे.
तिरोडा तालुक्याला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. रविवारी तालुक्यातील सर्रा माल्ही येथे गावालगत असलेल्या एका विना तोंडीच्या विहिरीत वाघ मृतावस्थेत पडून असल्याचे गावकऱ्यांना आढळला. गावकऱ्यांनी लगेच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करून मृत वाघाला विहिरीबाहेर काढण्यात आले.
वाघाच्या मृतदेहावरून हा वाघ चार दिवसांपूर्वी या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन विभागानं व्यक्त केला आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी व्हिसेरा, उत्तरीय तपासणी अहवालानंतरच कळेल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे जंगलातील पाणवठ्यांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Summary : A tiger died after falling into an open well in Tirora, Gondia, while searching for water and prey. The incident occurred near Navegaon-Nagzira Tiger Reserve. Forest officials estimate the tiger had been dead for four days. Investigations are underway to determine the exact cause of death.
Web Summary : गोंदिया के तिरोडा में शिकार और पानी की तलाश में एक बाघ कुएं में गिर गया, जिससे उसकी मौत हो गई। घटना नवेगांव-नागझिरा बाघ अभयारण्य के पास हुई। वन अधिकारियों का अनुमान है कि बाघ की मौत चार दिन पहले हुई थी। मौत के सही कारणों की जांच जारी है।