शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

तीन जण झाले कोरोनामुक्त तर दोघांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आता एकूण ६५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. जिल्ह्यात २५ जूनपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चिंता वाढविली असतानाच आता विदेशातून आपल्या स्वगृही परत येणाऱ्या नागरिकांनी चिंता वाढविली आहे.

ठळक मुद्देकोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६५ वर : ६०५ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असताना मंगळवारी (दि.७) पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली. तर तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता एकूण ६५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.जिल्ह्यात २५ जूनपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चिंता वाढविली असतानाच आता विदेशातून आपल्या स्वगृही परत येणाऱ्या नागरिकांनी चिंता वाढविली आहे. मंगळवारी आढळलेले दोन कोरोना बाधित रुग्ण हे बाहेरुनच आले आहे. यापैकी एक जण बंगलोर येथून तर दुसरा दुबई येथून आला होता. या दोघांनाही गोंदिया स्वागत लाईन येथील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी (दि.७) या दोघांचेही स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर टाकली असताना कोविड केअर सेंटरमधील तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने थोडा दिलासा देखील मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बेरे होण्याचे प्रमाण चांगले असून आतापर्यंत एकूण ११८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण ६५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १८५ वर पोहचला आहे.४५२२ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४७०७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १८५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ४५२२ नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ६१४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि मेडिकलला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या