शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील रुग्णांसाठी ते ठरत आहेत देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. ...

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. परिणामी या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. अशा स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्याचे व रुग्ण बरे करण्याचे काम डॉ. पिंकू मंडल यांनी केले. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचा सिटी स्कॅन स्कोअर सात, आठ, नऊ, दहा, बारापर्यंत होता, अशा रुग्णांना या ठिकाणी औषध उपचार करून पूर्णत: तंदुरुस्त करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना काळात परिसरातील रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले.

कोरोना बाबतीत जी समस्‍या निर्माण झाली होती, त्या समस्येतून बाहेर काढण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले. जे रुग्ण क्रिटिकल होते, त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले. एकंदरीत या परिसरात जे भयभीत वातावरण तयार झालेले होते, त्या वातावरणातून निवारण करण्याचे काम डॉ. मंडल यांनी केले. कोरोनाबाधित असलेल्या सामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसणार होता, त्या आर्थिक विवंचनेतून सोडविण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. आदिवासी बहुल भागामध्ये जवळपास पंधरा वर्षे ते अविरतपणे सेवा करीत आहेत. केशोरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील ज्या समस्या होत्या, त्या त्यांनी त्वरित सोडविल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राला एक स्वच्छ परिसर, पारदर्शक करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आरोग्य केंद्रास भेट दिली तर आरोग्य केंद्राचा एक सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळतो. आरोग्य केंद्रामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंब नियोजन या मोहिमेला सुद्धा त्यांनी महत्त्व दिले. शंभर टक्के कुटुंब नियोजनाचे कामसुद्धा त्यांनी केले. या परिसरातील ज्या व्यक्तीने विष प्राशन केलेले असते, त्या व्यक्तींना कुठे न पाठविता त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करून त्या रुग्णांना बरे करण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली वैद्यकीय सेवा करून इतर वेळेत ते रुग्णांची सेवा करतात.

.....

शिस्त पाळली तर हा संसर्ग टाळता येतो

नागरिकांनी शिस्त पाळली तर प्रशासनावरील ताण कमी होईल. काही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषध उपचार केला तर खरा आजार लपेल आणि नंतर भयानक रूप घेऊन पुढे येईल. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. स्वयंशिस्त औषधापेक्षाही प्रभावी असून, तीच आपल्या संकटाला सावरेल, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.