२८१ अंगणवाड्यांमध्ये अजूनही पाण्याची सोयच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:00 AM2020-10-13T05:00:00+5:302020-10-13T05:00:10+5:30

यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अंगणवाड्या व शाळा सुरू झालेल्या नाही. मात्र तरी यात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यातील बालकांसाठी पिण्याचे शुध्द पाणी व शौचालयाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

There is still no water facility in 281 Anganwadas | २८१ अंगणवाड्यांमध्ये अजूनही पाण्याची सोयच नाही

२८१ अंगणवाड्यांमध्ये अजूनही पाण्याची सोयच नाही

Next
ठळक मुद्देजि.प.महिला व बालकल्याण विभाग : वर्षभरापासून उपाययोजना


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सरकारतर्फे सामान्य नागरीकांना मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतुु या व्यतिरिक्त शाळा व अंगणवाडीतील बालकांना पाण्यासाठी कासाविस व्हावे लागत आहे. जिल्ह्यातील २८१ अंगणवाड्यांमध्ये हजारो चिमुकल्यांना पिण्यासाठी पाण्याची सोयच नसल्याची बाब पुढे आली आहे.
यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अंगणवाड्या व शाळा सुरू झालेल्या नाही. मात्र तरी यात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यातील बालकांसाठी पिण्याचे शुध्द पाणी व शौचालयाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु अनेक अंगणवाड्यांत ह्या दोन्ही सोयीसुविधा उपलब्ध नाही. जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यालय आहेत. १५६४ अंगणवाड्या आहेत. यापैकी १२८३ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. परंतु २८१ अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ज्या अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाहीत. त्यात गोंदिया १ मध्ये ४२, गोंदिया-२ मध्ये १७, आमगाव ५६, सडक-अर्जुनी ५४, सालेकसा ४०,गोरेगाव ३९, देवरी ३३ अंगणवाड्यांच्या समावेश आहे. केवळ अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या दोनच तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत चांगले काम झाल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसल्यामुळे स्वच्छ भारत अभियानावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ग्रामीण भागात सर्व घरात शौचालय आहेत. सर्व लोक शौचालयाचा वापर करीत आहेत का हा देखील चिंतनाचा विषय आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यात १२९३ शौचालय आहेत.परंतु २७१ अंगणवाड्यांमध्ये शौचालय नाहीत. यात प्रकल्प कार्यालय गोंदिया-१ अंतर्गत ३३, गोंदिया-२ मध्ये २२, सालेकसा ७०,सडक-अर्जुनी ३४, देवरी २७, तिरोडा ३६, गोरेगाव २६, आमगाव १४ व अर्जुनी-मोरगाव ९ अंगणवाड्यांचा समावेश आहे.


१५१० अंगणवाड्यांना
जिल्ह्यातील १५६४ अंगणवाड्यांपैकी १५१० अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. केवळ ५४ अंगणवाड्यांच्या स्वतंत्र इमारती नाहीत. यातील ४ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत,४ इमारत खासगी, १३ अंगणवाड्या प्राथमिक शाळांच्या इमारतीत, १४ समाज मंदिरात, ५ ग्रामपंचायत व १४ अंगणवाड्यात इतर ठिकाणी सुरू आहेत.

Web Title: There is still no water facility in 281 Anganwadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.