शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्दे३८ रुग्ण तर २१ संशयित आढळले : १६ हजार बाधितांचे केले सर्वेक्षण

 अंकुश गुंडावार  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३८ रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे तर २१ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. आतापर्यंत चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर २० रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यादरम्यान म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले ३८ तर संशयित २१ रुग्ण आढळले. यात ६९५ मधुमेह रुग्णांचा समावेश होता. याच रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहे. आरोग्य विभागाने संशयित रुग्णांना वेळीच उपचारासाठी नागपूर येथे रेफर केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजारांवर कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे आता आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांची तपासणी करीत आहे. त्यातच आता म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले रुग्ण पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे.

ही आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणेम्युकरमायकोसिस नावाची काळी बुरशी जमिनीत खतांमध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांमध्ये तसेच हवेत अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकात आणि नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाकात त्रास होणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात हिरड्या दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दात हलणे, रक्ताची उलटी ही या आजाराची लक्षणे आहेत.ही घ्या काळजीरक्तातील साखरेची एचबीआयसीची चाचणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी याचे निरीक्षण स्टेराॅईडचा अतिवापर टाळा, स्वत:च्या मनाने कुठलेही औषध घेऊ नका, घरी ऑक्सिजनचा वापर करीत असला तरी योग्य ती काळजी घ्या, निर्जंतुक पाण्याचा वापर करा, अँटिफंगलचा औषधांचा वापर करा, डॉक्टरांचा नियमित सल्ला घेत राहा.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे म्युकरमायकोसिसच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत १६ कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ३८ रुग्ण तर २१ संशयित रुग्ण आढळले. यापैकी काही रुग्णांना नागपूर येथे रेफर केले, तर काही रुग्णांवर गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.- डाॅ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या