जिल्ह्यात चार दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:29+5:30

१९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील चार दिवसात जिल्ह्यात नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मागील ११ दिवसांच्या कालावधीत एकूण ५८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्हावासीयांना निश्चित दिलासा मिळाला आहे.

There are no new corona patients in the district in four days | जिल्ह्यात चार दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

जिल्ह्यात चार दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

Next
ठळक मुद्देपुन्हा ६ जण झाले कोरोनामुक्त । आता जिल्ह्यात ११ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील ४ दिवसांत जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. तर शनिवारी (दि.६) पुन्हा ६ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील ६९ कोरोना बाधीतांपैकी ५८ जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता ११ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत आहे. कोरोना बाधीत रुग्ण वाढीच्या संख्येला ब्रेक लागल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
१९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील चार दिवसात जिल्ह्यात नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मागील ११ दिवसांच्या कालावधीत एकूण ५८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्हावासीयांना निश्चित दिलासा मिळाला आहे. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या सहा रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील २, सडक-अर्जुनी तालुक्यातील ३ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ एका जणांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील १०९७ जणांच्या स्वॅबचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६९ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असल्याने निश्चितच ही दिलासा देणारी बाब आहे. जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थामध्ये २१२४ आणि १८७९ जण होम क्वारंटाईन आहे.
असे आहे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण
जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाºयाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळेच मागील ११ दिवसांत एकूण ५८ जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यात २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे रोजी ४, ३१ मे रोजी ६ रुग्णांना, १ जून रोजी ६, २ जून रोजी ४, ३ जून रोजी २, ५ जून रोजी २,६ जून रोजी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मंगळवारी सुरू होणार प्रयोगशाळा
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रयोगशाळा गोंदिया येथे नव्हती. त्यामुळे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले जात होते. मात्र आता गोंदिया येथील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. या प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीची ट्रायल देखील घेण्यात आली. त्यात नमुने तपासणीचे अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेशी जुडले. एम्सकडून यासाठी प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. आता केवळ आयसीएमआरकडून पासवर्ड आणि आयडी मिळाल्यानंतर मंगळवारपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: There are no new corona patients in the district in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.