शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेसाठी शिक्षकांची धडपड

By admin | Updated: November 8, 2015 01:53 IST

अनेकदा शिक्षण विभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळवूनही उपयोग झाला नाही. वर्षभरापासून लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले.

निलज खुर्द शाळेची व्यथा : शिक्षकांच्या कमतरतेकडे विभागाचे दुर्लक्षकरडी (पालोरा) : अनेकदा शिक्षण विभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळवूनही उपयोग झाला नाही. वर्षभरापासून लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळू पाहत होती. अध्यापनाचे कार्य खंडीत होत होते. यावर उपाय म्हणून शिक्षकांनीच पुढाकार घेतला आणि स्वत:च्या वेतनातून दोन पदवीधरांची परस्पर नेमणूक केली. मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द शाळेतील हा प्रकार आहे. शाळेत इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळेत दोन पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असून मुख्याध्यापकाला स्वत:च तिन्ही वर्ग सांभाळावे लागत आहे.निलज खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठविपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. विद्यार्थी पटसंख्या १०८ आहे. प्राथमिक स्तरावरील वर्ग १ ते ५ मध्ये तीन शिक्षकांची नियुक्ती आहे. परंतू वर्ग ६ ते ८ मध्ये एकाच पदविधराची नियुक्ती आहे. सदर पदवीधर शिक्षक नरेंद्र देशमुख यांचेकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. शाळेचे अध्यापन व विविध कार्य, प्रशिक्षण, बैठका, सांभाळताना अध्यापनाचे कार्य मागे राहायचे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ता ढासळण्याच्या मार्गावर आहे. दोन पदविधरांची नियुक्ती करावी, याबाबत गटशिक्षणाधिकारी मोहाडी यांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कार्यवाही झाली नाही. शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला अनेकदा कळविण्यात आले. मात्र उपयोग झाला नाही.शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण प्रत्यकवेळी सांगण्यात आले, पण समस्याचे समाधान कुणीही काढले नाही. अच्छे दिनाचे नारे देणाऱ्यांनी सुद्धा बुरे दिन सुरू झाले असताना व्यवस्था परिवर्तनासाठी वेळीच पावले उचलली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुचंबना सुरू झाली.कुणीही लक्ष देत नसल्याचे लक्षात आल्यानेच शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांनीच समस्येवर उपाय शोधण्याचे ठरविले. त्यांनी स्वत:च्या वेतनातून दोन शिक्षकांची मानधनावर परस्पर नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कार्य सुरू करण्यात आले आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीवर शासनाकडून चिंतन होत असताना शिक्षकांनी मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी हाती घेतलेला उपक्रम शासन व समाजासमोर आदर्श ठरला आहे.(वार्ताहर)