शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफीयांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व मालकांसह हमालांनी त्यांच्या पथकावर लाठ्याकाठ्यांसह दगडफेक करुन हल्ला केला.

ठळक मुद्देविदर्भ तहसीलदार संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेती माफीयांकडून नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.११) सकाळी गोंदिया तालुक्यातील तेढवा रेती घाटावर घडली. या घटनेचा विदर्भ तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना शाखा गोंदियाच्यावतीने निषेध करण्यात आला. पथकावर दगडफेक करुन हल्ला करणाºयावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व मालकांसह हमालांनी त्यांच्या पथकावर लाठ्याकाठ्यांसह दगडफेक करुन हल्ला केला. यात नायब तहसीलदार सचिन पाटील व पथकात असलेल्या तलाठी बुचे, हटवार, राठोड व भोयर हे किरकोळ जखमी झाले.तसेच खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या हल्ल्यादरम्यानच पथकाने पकडलेले रेतीचे वाहन रेती माफीयांनी बळजबरीने पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणात रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेती माफीयांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची ही दुसरी घटना असून अशा घटनांना वेळीच पायबंद लावण्यासाठी रेती माफीयांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.तलाठी संघटनेने केला निषेधतेढवा घाटावर रेती माफीयांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा तलाठी संघटनेने गुरूवारी गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत घटनेचा निषेध नोंदविला. तसेच आरोपींवर कडक कारवाईची आणि पथकाला पोलीस सरंक्षण देण्याची मागणी केली.तेढवा येथील रेती घाटावर काही राजकीय पक्षाच्या वरदहस्ताने सध्या रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदार