शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.सदस्य मडावी यांच्यावर कारवाई करा

By admin | Updated: April 12, 2017 01:15 IST

जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्यावर हल्ला करून...

जिल्हा कॉंग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन गोंदिया : जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्यावर हल्ला करून त्यानंतर स्वत: त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार नोंदविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य सुनिता मडावी यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना सोमवारी (दि.१०) निवेदन दिले. कॉंगे्रस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात, सभापती कटरे हे स्वच्छ छवीचे नेता असून यापूर्वीही ते सभापती राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजीत सभेत पिठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे , मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत कटरे यांनी जिल्हा परिषद सदस्य मडावी यांच्या विरूद्ध अयोग्य शब्दाचा प्रयोग केलेला नाही. मात्र सभागृहात झालेल्या प्रकरणानंतर मडावी यांनी कटरे यांच्या विरोधात एट्रॉसिटीच्या खोटी तक्रार देऊन दबाव टाकत आहेत. याचा जिल्हा कॉंग्रेस कमिटीने निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही कॉंग्रेस कमिटीच्या मागणीचे समर्थन केले. यावर पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी, तक्रारीची चौकशी करून त्यानंतरच योग्य निर्णय घेणार, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्या प्रतिनिधी मंडळात आमदार अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे, उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, डॉ. योगेंद्र भगत, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, जिल्हा महासचिव सहेसराम कोरोटे, अमर वराडे, राजेश नंदागवळी, राधेलाल पटले, संदीप ठाकूर, डेमेंद्र रहांगडाले, जितेंद्र कटरे, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, टिनू पटेल, यादनलाल बनोटे, विशाल शेंडे, अरूण दुबे, सुशिल रहांगडाले, व्यंकट पाथरू, मनोज पटनायक, जगदीश येरोला, मनोज वालदे, दिल्लू गुप्ता, राहूल कटरे, सौरभ भेलावे, अमर रंगारी, आनंद बागडे, गेंदलाल कुंभरे, नरेश राऊत, भरत बोरीकर, अ‍ॅड.पी.सी.चव्हाण, क्र ांती जायस्वाल, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, निता पटले, निर्मला मिश्रा, रमेश अंबुले, विठोबा लिल्हारे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)