शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वसंरक्षणासाठी तायक्वांडो उपयुक्त

By admin | Updated: May 24, 2014 23:41 IST

जगाच्या पाठीवर शेकडो खेळाचे प्रकार आहेत. यातच तायक्वांडो हा खेळही अत्यंत महत्वाचा आहे. सुरूवातीला या खेळाकडे दुर्लक्ष केले असले तरी आता या खेळाला केंद्र व राज्य शासनाने विविध

नरेश रहिले - गोंदिया

जगाच्या पाठीवर शेकडो खेळाचे प्रकार आहेत. यातच तायक्वांडो हा खेळही अत्यंत महत्वाचा आहे. सुरूवातीला या खेळाकडे दुर्लक्ष केले असले तरी आता या खेळाला केंद्र व राज्य शासनाने विविध शासकिय क्रिडा स्पर्धेत समाविष्ट केले आहे. स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या या खेळातून शारिरिक, मानसिक व बौध्दीक विकास घडून येतो. महिलांना आत्मनिर्भय होण्याचे हे एक माध्यम आहे, असे तायक्वांडो या आलिम्पीक खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच दुलीचंद मेश्राम यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीतून सांगितले आहे.

तायक्वांडो हा खेळ दक्षिण कोरीया या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. हा खेळ १९८८ पासून सेऊल ऑलिम्पीक क्रिडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून ऑलिम्पीकमध्ये हा खेळ नियमित खेळल्या जात आहे. हा खेळ केंद्र सरकारच्या शालेय क्रिडा स्पर्धा, ग्रामीण (पायका) व अखिल भारतीय विद्यापिठ यांच्यातही समाविष्ट आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर सेफ गेम्स, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, तसेच विश्‍वकप तायक्वांडो स्पर्धेत सुध्दा होत आहे. तायक्वांडो या खेळाला राज्यसरकारने अधिकारी तथा कर्मचारी भरती प्रक्रियेत खेळाच्या कोट्यात पाच टक्के आरक्षण दिले आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेतही आरक्षण दिले आहे. या खेळाने गोंदिया जिल्ह्यात सन २00५ मध्ये पाय रोवले. जिल्हा असोशिएशनची स्थापना करण्यात आली. या असोशिएसनच्या अध्यक्षपदी जिल्ह्यात पोलीस अधिक्षक यांचीच निवड करण्यात आली आहे. आतापर्यंंत जिल्हा संघटनेने या खेळाच्या आठ जिल्हास्तरीय, तीन विभागीय, चार विदर्भस्तरीय व एक राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा घेतल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात या खेळासाठी ५00 खेळाडूंची नोंदणी आहे. या संघटनेने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुका पातळीवर या खेळाचे प्रशिक्षण संघटनेमार्फत सुरू केले. या खेळाला केंद्र व राज्य शासनाची मान्यता आहे. तरी देखील या खेळाकडे जिल्ह्यातील तरूणांचा कल पाहिजे तेवढा नाही. या खेळात प्रवेश करतांना पहिल्या तीन महिन्याच्या आत एलोबेल्ट, त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यात ग्रीन, ग्रीनवन, ब्लू, ब्लूवन, रेड, रेडवन, प्रत्येक एक वर्षाने ब्लॅकबेल्ट फस्र्ट डॅन पासून समोरच्या पदव्या जागतिक तायक्वांडो कुकीऑन दक्षिण कोरीयातून दिल्या जातात. जिल्ह्यात आता पर्यंंत १0 ब्लॅकबेल्ट तर ५00 कलरबेल्ट आहेत. चार राष्ट्रीय पंच तर एक आंतरराष्ट्रीय पंच कार्यतर आहेत. जिल्ह्यात तायक्वांडो असोशिएशनच्या स्थापनेपासून आजपर्यंंत दुलीचंद मेश्राम कार्यरत आहेत. महाराष्ट्र तायक्वांडो संघटनेवर कार्यकारिणी सदस्य व तांत्रीक समिती सदस्य म्हणून मेश्राम कार्यरत आहेत. राष्ट्रीय खेळाडू व अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धा संचालक (कॉम्पीटेशन डायरेक्टर) म्हणून कार्य केले आहेत. यामुळे त्यांना १३ राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पंच व तांत्रीक अधिकारी म्हणून काम केले आहे. ते या संघटनेचे जिल्हा सचिव आहेत. सद्यस्थितीत हरियाणाच्या कुरूक्षेत्रात होणार्‍या राष्ट्रीय सबज्युनियर व केडेट तायक्वांडो स्पर्धेकरीता पंच व तांत्रीक अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून त्यांची निवड झाली. त्यांना आतापर्यंंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक व अनेक मंत्र्याच्या हस्ते विविध राज्यातून गौरविण्यात आले आहे. गोंदियातील युवक-युवती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकीक करण्यासाठी सबळ व्हावे यासाठी मेश्राम यांनी स्वत: गोंदिया येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मोफत प्रशिक्षण देत आहेत. हल्लीच्या काळात महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. अशातच महिलांनी या तायक्वांडोचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांना स्वत:चे रक्षण सहज करता येईल असा माणस त्यांनी बांधला.