शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यात जे पॉझिटीव्ह रु ग्ण आढळून आले आहेत, त्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ठळक मुद्देसंजीव कुमार : कोरोना विषयक आढावा सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काळजीपूर्वक काम करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी (दि.२३) कोरोना विषाणू संदर्भात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. सभेला अपर आयुक्त अभिजित बांगर, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ. संजय झोडापे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. संजीव कुमार यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने टीमवर्क म्हणून काम करावे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हँडवॉशच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यात जे पॉझिटीव्ह रु ग्ण आढळून आले आहेत, त्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.सभेला सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मीता बेलपत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रु खमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिल्पा सोनाळे, रविंद्र राठोड, गंगाराम तळपाडे, गोंदिया नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील व आय.एम.ए.चे डॉक्टर्स उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या