जिल्ह्यातील ३६४ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:29+5:30

जिल्ह्यात सध्या स्थितीत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मागील ३८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

Swab samples of 364 people in the district were negative | जिल्ह्यातील ३६४ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

जिल्ह्यातील ३६४ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

Next
ठळक मुद्दे४९ जण आयसोलेशनमध्ये : ५३ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३७२ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३६४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ८ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यात सध्या स्थितीत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मागील ३८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसून येताच त्यांना आयसोलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे.गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात सध्या ४६ जण आणि आमगाव भवभूती महाविद्यालय १, एम.एस.आयुर्वेदिक महाविद्यालय १ आणि केटीएस जिल्हा सामान्य रुगणालय १ असे एकूण ४९ जण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत.
तर सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ६३ जण उपचार घेत आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा १०, उपकेंद्र बिरसी ७, शासकीय आदिवासी आश्रमशाळा इळदा २६, समाजकल्याण निवासी शाळा डव्वा ७ आणि जलराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ६३ व्यक्ती उपचार घेत आहेत.

Web Title: Swab samples of 364 people in the district were negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.