शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: April 30, 2016 01:46 IST

दि.२७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने सटवा, डव्वा, गणखैरा, तुमखेडा या गावांना झोडपून काढले.

गोरेगाव : दि.२७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने सटवा, डव्वा, गणखैरा, तुमखेडा या गावांना झोडपून काढले. हजारो घरांच्या छतावरील टिनपत्रे, कवेलू पूर्णत: उडाली. रबी पिकाला प्रचंड फटका बसला. हजारो झाडे उन्मडून पडली. शेतकऱ्यांच्या लाखोंचे नुकसान झाले व ते आर्थिक संकटात सापडले.विजेची तारे रस्त्यावर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. सटवा येथे चक्रीवादळाने तब्बल २०० च्या वर घरातील टीनपत्र व कवेलू शेकडो मीटर दूर उडून गेली. घटना रात्रीला घडल्याने प्राणहानी झाली नाही, पण जनावरांना इजा झाली. शाळेच्या टाकीवरील पाणी टाकी उडून गेली. डव्वा येथे विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. प्रचंड वित्तहानी झाली. मागील पाच दशकांपूर्वीपासून असा चक्रीवादळ आपल्या जीवनात कधीही पाहिले नसल्याचे गावातील वृद्धांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस पाटील व सरपंच यांच्या सूचनेनुसार, तलाठी चौधरी यांनी घटनेचा पंचनामा केला. परिसरातील नुकसान पाहता काही लोकप्रतिनिधींनी तहसीलदार डहाट यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. राष्ट्रवादीच्या वतीने २९ एप्रिल रोजीच्या मोर्च्यात चक्रीवादळ ग्रस्तांना मदत देण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात पोलीस पाटील, सरपंच यांच्या मदतीने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात येत असला तरी त्यांना आर्थिक मदत केव्हा मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्तांनी उपस्थित केला आहे. नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी सटवाचे सरपंच रमेश ठाकूर, डव्वाचे सरपंच जगदीश बोपचे, गणखैराचे सरपंच के.टी. राऊत, भागचंद्र रहांगडाले, माजी पं.स. सदस्य युवराज रहांगडाले आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)