शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सभापतींची निवडणूक १५ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

१६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपत आहे. एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहत असल्याने व १६ तारखेला रविवारी येत असल्याने १५ तारखेला सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे असून पाणी पुरवठा, शिक्षण, नियोजन, आरोग्य व महिला-बाल कल्याण समितीचे सभापतीही भाजपचेच आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीचे वारे वाहू लागले : नवख्यांना संधी की जुने येणार पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या १६ तारखेला संपत असल्याने १५ तारखेला सभापतींची निवडणूक घेतली जाणार आहे. सभापतीपद मिळावे यासाठी इच्छूकांकडून सेटींग तर लावली जातेच मात्र आता यंदा नवख्यांना संधी दिली जाते की जुने पुढे येतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपत आहे. एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहत असल्याने व १६ तारखेला रविवारी येत असल्याने १५ तारखेला सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे असून पाणी पुरवठा, शिक्षण, नियोजन, आरोग्य व महिला-बाल कल्याण समितीचे सभापतीही भाजपचेच आहेत. सभापतिपदासाठी आतापर्यंत बघायचे झाल्यास सर्वांनाचा संधी दिली जात असल्याचे दिसून येत आहे. अशात यंदा मात्र काही जुन्या सदस्यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदा नवख्यांना संधी देत जुन्यांनाही खुर्ची दिली जाते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती पदासाठी आतापासूनच इच्छूकांकडून इच्छा व्यक्त केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र पक्षाकडून ज्यांची नावे निश्चित केली जाणार त्यांच्याच गळ््यात सभापतीपदाची माळ पडणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. त्यामुळे आता १५ तारखेला सभापतीपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मोठ्या कलाटणीची शक्यतानगर परिषदेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र राजकारणात कधी काय होणार हे सांगता येत नाही. कारण, नगर परिषदेतील संख्या बळ बघता भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य व नगराध्यक्ष असे १९ सदस्य होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, नगर विकास आघाडीचे ८ व काँग्रेस पक्षाचे ९ सदस्य आहेत. अशात राष्ट्रवादी, आघाडी व काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी हात मिळवणी केल्यास त्यांचे २४ सदस्य होतात. मात्र यातील ३ सदस्य भाजपच्या विरोधात जाणार नसून ते भाजपसोबत राहत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे २१ तर तिघांच्या आघाडीचे २२ संख्याबळ होते. अर्थात, असे झाल्यास फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता टाळता येत नाही. असे झाल्यास भाजपसाठी येणारा काळ कठीण जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नसून तशा चर्चाही रंगत आहेत.खुर्चीसाठी सेटींग सुरूनगर परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त जोर बांधकाम समिती सभापतिपदासाठी लावला जातो. सध्या बांधकाम समिती सभापती धर्मेश अग्रवाल, नियोजन समिती सभापती सचिन शेंडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा खरोले, शिक्षण समिती सभापती मौसमी सोनछात्रा व पाणी पुरवठा समिती सभापतीपदी नितू बिरीया आहेत. सर्वच भारतीय जनता पक्षाचे असून आतापर्यंत सभापतीपदासाठी सर्वांनाच संधी दिली जात असल्याचे दिसत आले आहे. त्यामुळे आता यंदाही उरलेल्या सदस्यांना संधी दिली जाईल असे वाटते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका