शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सडक-अर्जुनीतील घोळ एक कोटीवर

By admin | Updated: May 5, 2016 01:41 IST

शासकीय वेतन, वेतनातील कपाती, मानधनाची राशी संबंधित प्राधिकरणास, व्यक्तीस व शाळांना वेळीच वाटप न करता अधिकाऱ्यांची दिशाभूल करून ....

लिपिकाचा प्रताप : परस्पर स्वत:च्या खात्यावर रक्कम हस्तांतरित गोंदिया : शासकीय वेतन, वेतनातील कपाती, मानधनाची राशी संबंधित प्राधिकरणास, व्यक्तीस व शाळांना वेळीच वाटप न करता अधिकाऱ्यांची दिशाभूल करून परस्पर स्वत:च्या बँक खात्यावर हस्तांतरीत केल्याचा प्रकार सडक-अर्जुनी पंचायत समितीत घडला. यात एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. अद्यापही काही रोख पुस्तिका, धनादेश नोंदवही, वाटप नोंदवही, पेड व्हाऊचर व पावत्या उपलब्ध नसल्याचे समजते. हा प्रताप सडक अर्जुनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे रोखपाल सुनील पटले यांनी केल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला. विशेष म्हणजे हा गोरखधंदा गेल्या सात वर्षापासून सुरू होता. शालेय पोषण आहाराचे २ लाख ६३ हजार २५० व बँक स्क्रोलनुसार अंदाजे ४४ लक्ष रुपये स्वत:च्या बँक खात्यात जमा केल्याची तक्रार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ३ फेब्रुवारी २०१६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. गोंदिया जिल्हा परिषदेने १४ फेब्रुवारी रोजी चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली. यात उपशिक्षणाधिकारी एल.एम.मोहबंशी, वित्त विभागाचे सहायक लेखा अधिकारी यु.जे.पंधरे, सा.प्र.विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी.जी.शहारे व वित्त विभागाचे वरिष्ठ सहायक व्ही.झेड. भुरे यांचा समावेश होता. या समितीने १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान चौकशी केली. २३ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदविली. चौकशी समितीने तत्कालीन व सध्या कार्यरत असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. एस.जी. पटले यांचेशी निगडित संभाव्य बँकाशी संपर्क साधून त्याच्या बँक खाते व्यवहाराची माहिती घेतली. पंचायत समिती शिक्षण विभागात उपलब्ध असलेले धनादेश, धनाकर्ष व रोकडवही सीलबंद करून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सुपुर्द करण्यात आला.गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयातील २६ मे २०११ च्या पूर्वीची रोकडवही उपलब्ध नाही. २००९-१० या आर्थिक वर्षात गटविकास अधिकाऱ्यांनी हस्तांतरीत योजनेतून ८ लाख ९५ हजार ७६७ रुपयांचे धनादेश दिले मात्र त्या कालावधीची रोकडपुस्तिका उपलब्ध नसल्यामुळे ही राशी कशाची आहे ते चौकशी समितीला तपासणी करता आली नाही. त्याचप्रमाणे याच आर्थिक वर्षातील १० लाख ५ हजार ३२० रुपयांच्या धनादेशांचा उलगड होऊ शकला नाही. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीतील वेतन, वेतनातील कपात व शालेय पोषण आहाराच्या ९७ लाख ८२ हजार ७८२ रुपयांचे धनादेश गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रोख वहीला जमा न घेतल्याने एवढ्या रकमेचा तात्पुरता अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. चौकशी समितीला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या दस्तऐवजानुसार मंजूर देयके व त्यांच्या कपाती उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे प्राप्त राशी व वितरित केलेली राशी यांचा ताळमेळ समितीला करता येऊ शकला नाही. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप.बँक शाखा सडक-अर्जुनी यांचेकडून ३२ लाख ७२ हजार २४६ रुपयांचे १३ धनाकर्ष तयार करण्यात आले. ही राशी विविध प्राधीकरणांच्या नावे आहे. परंतु हे सर्व धनाकर्ष शिक्षण विभागातच पडून आहेत. रोखपालाने संबंधित प्राधिकरणांकडे हे धनाकर्ष जमा केलेच नाहीत. हे धनाकर्ष चौकशी समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सुपुर्द केले. यापैकी १७१७८५ व २७६८४४ या क्रमांकाचे धनाकर्षाची ३० लाख ७ हजार ८६९ रुपयांची राशी रोखपाल एस.जी.पटले यांनी भारतीय स्टेट बँक गोंदियाच्या स्वत:च्या वैयक्तिक खात्यात खाते क्र. ३४०८८६२३०६७ मध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला. धनाकर्षावर असलेली खोडतोड अथवा वैयक्तिक नावाने असल्याने बँकेने हे धनाकर्ष स्वीकारले नसावे, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)