शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी, वैरागडात धान खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: November 18, 2015 01:57 IST

१० आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते.

देवरी : १० आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु आधारभूत केंद्राच्या अडचणीमुळे धान खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. त्याचा त्रास शेतकरी बांधवाना सोसावा लागला. याबद्दल आमगाव विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी ९ नोव्हेंबर रोजी राज्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची भेट घेऊन चर्चा केली. शेवटी प्रधान सचिव यांनी सर्व आधारभूत धान खरेदी केंद्राना १० नोव्हेंबर २०१५ पासून आदिवासी सहकारी संस्थाचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. या अनुषंगाने मंगळवारी १० नोव्हेंबरला देवरी व चिचगड येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्राची सुरूवात माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास महामंडळ नाशीकचे संचालक भरतसिंग दुधनाग होते. अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, जगदीश नरवरे आदी उपस्थित होते.या वेळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या धानाची मान्यवराच्या हस्ते मोजमाप करून खरेदी करण्यात आली. धान खरेदी केंद्राची सुरूवात करण्याकरिता आ. संजय पुराम यांच्या प्रयत्नांबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. क्षेत्रातील सर्वच आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कटीबध्द असल्याचे आ. संजय पुराम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)