१ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष वर्ग व शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:44+5:30

शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी अवलंब करावा असे सांगितले आहे.

Start live classes and schools from October 1 | १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष वर्ग व शाळा सुरू करा

१ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष वर्ग व शाळा सुरू करा

Next
ठळक मुद्देशिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना : शिक्षण मंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशात विद्यार्थी बाधित होऊ नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करावे अशी मागणी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेच्यावतीने उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावाने निवेदन देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी अवलंब करावा असे सांगितले आहे. ऑनलाइनची संकल्पना जरी चांगली असली तरी ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता व नेटवर्कची समस्या असल्याने ५० टक्के विद्यार्थी या प्रणाली पासून वंचित राहणार आहेत. तसेच २० ते २५ टक्के विद्यार्थी या प्रणालीला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे ७५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी टीव्हीसारख्या माध्यमांद्वारे शिक्षण व मुलांच्या बुद्धीला चालना देणारे विविध उपक्रम देण्याचे नियोजन करावे. तसेच १५ जूनच्या शासन परिपत्रकानुसार शाळा सुरू केल्यास संस्थाचालकांपुढे फर्निचर, फिजिकल डिस्टंन्सिग आणि विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांपुढे वर्गखोल्या व शिक्षकांची समस्या निर्माण होईल. त्यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू करताना नियोजनांतर्गत पुढील बाबींचा विचार करावा अशी मागणी केली आहे.
तसेच, शैक्षणिक वर्षात जवळपास १५३ दिवस प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन कार्य होते. अशात १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू केल्यास १५३ दिवस मिळतात व जून ते सप्टेंबर महिन्यातील ७६ दिवसांच्या दिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून काही प्रमाणात भरून काढता येईल. वर्ग दहावी व बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १३० दिवसांची गरज असून उर्वरित कार्यभार दिवस परीक्षा व परीक्षा पूर्वतयारीसाठी उपयोगी पडतात. १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शाळा सुरू केल्यास १५३ दिवस मिळतात. त्यात दिवाळी, उन्हाळा व वर्षातील सार्वजनिक सुट्या कमी केल्यास जवळ-जवळ ४० ते ५० दिवस मिळतात.
यासाठी शैक्षणिक सत्राचा कालावधी वाढवावा, दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये न घेता ३० दिवस पुढे वाढविण्यात याव्यात व अभ्यासक्रम २५ टक्के कमी करावा असेही निवेदनातून सूचविण्यात आले असून निवेदन देताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, उपाध्यक्ष अनिल मंत्री, कार्यवाह टी. एस. गौतम, के. सी शहारे उपस्थित होते.

फक्त वार्षिक परीक्षा घ्या
१ ऑक्टोबर पासून शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी करीत असतानाच संघटनेने वर्ग १ ते ८ तसेच ९ ते ११ ची फक्त वार्षिक परीक्षा घ्यावी व ती मे महिन्यात घेऊन निकाल जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर करावा. तसेच पुढील शैक्षणिक सत्र १ जुलै पासून सुरू करावे अशीही मागणी केली आहे.

Web Title: Start live classes and schools from October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.