शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील स्वच्छतेवर आता पथकाची नजर

By admin | Updated: November 13, 2014 23:03 IST

स्वच्छता अभियानाला गती देण्यााठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्याअंतर्गत पथकांचे गठन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृहे तपासणी

गोंदिया : स्वच्छता अभियानाला गती देण्यााठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्याअंतर्गत पथकांचे गठन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृहे तपासणी पथकाने १२ आॅक्टोबर रोजी शहरातील विविध स्थळांची पाहणी केली. पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून तसेच बैठकांचे आयोजन करून जनजागृती करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला देशभरातून प्रतिसाद लाभत असतानाच आता गोंदिया शहरासह जिल्ह्यातील अस्वच्छतेबद्दल जिल्हा प्रशासन गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाच्या कडक अंमलबजावणीसाठी विविध पथकांचे गठन केले आहे. यातील जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृह तपासणी पथकाने १२ आॅक्टोबर रोजी शहरात पाहणी केली. जिल्हा पथकाचे सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह नगर परिषद आरोग्य निरीक्षक मनकवडे, गणेश हतकय्या, मुकेश तिवारी यांनी शहरात पाहणी केली. या पथकाने कुरील यांच्या मार्गदर्शनात नगर परिषद कार्यालयासह केटीएस रूग्णालय, नगर परिषद कन्या विद्यालय, प्रभु रोड, रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल अप्सरा व हॉटेल उमेश, रेल्वे स्थानकाच्या आत व बाहेरचा परिसर, मुख्य बाजारभागातील सार्वजनिक शौचालय, मुख्य बस स्थानक, रेलटोली परिसरातील नगर परिषद हिंदी शाळा तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी केली. या पाहणीअंतर्गत पथकाने नागरिकांना सफाई अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश आरोग्य निरीक्षकांना यावेळी देण्यात आले. विशेष म्हणजे केटीएस रूग्णालयातील पाहणीदरम्यान डॉक्टरांना रूग्णालयाच्या सफाईसह मेडीकल वेस्टेजची नियमबद्धरित्या विल्हेवाट लावण्यासंबंधी निर्देश देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)