शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

गावातील सौर दिवे अंधारात गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

अनेक गावांतील चौकात रात्रीला उजेड असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड रंगायचा. कुठल्याही वीज बिलाशिवाय प्रकाश देणारे हे सौरदिवे नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता. भारनियमनाच्या काळात ग्रामीण भागात सोईचे असणारे सौर दिवे नागरिकांसाठी वरदान ठरले होते. परंतु चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून नेल्याने कित्येक गावांतले दिवे सद्यस्थितीत बंद पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी पुन्हा अंधार आला आहे.

ठळक मुद्देजैसे थे स्थिती । चोरट्यांचा बॅटऱ्यांवर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेद्वारा ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या सौर दिव्यांमुळे गावागावातील प्रमुख चौक उजळून निघाले होते. परंतु चोरट्यांची वक्र दृष्टी या सौर दिव्यांवर पडली आणि बॅटरी अभावी सौर दिवे पुन्हा बंद पडले आहे.अनेक गावांतील चौकात रात्रीला उजेड असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड रंगायचा. कुठल्याही वीज बिलाशिवाय प्रकाश देणारे हे सौरदिवे नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता. भारनियमनाच्या काळात ग्रामीण भागात सोईचे असणारे सौर दिवे नागरिकांसाठी वरदान ठरले होते. परंतु चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून नेल्याने कित्येक गावांतले दिवे सद्यस्थितीत बंद पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी पुन्हा अंधार आला आहे.सध्या मात्र अंधारात गडप झालेल्या दिव्याखाली अंधार अशी स्थिती आहे. मुळात या सौर दिव्यांची उंची कमी आहे. त्यामुळे चोरट्यांना या सौर दिव्याच्या बॅटरीपर्यंत सहज पोहचता येत असल्याने चोरी झाली आहे.लॉकडाऊनच्या काळात सौर उर्जेच्या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात पळविण्यात आल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आल्याने सायंकाळ होताच गावागावात स्मशान शांतता पसरत होती.जेवणानंतर लोक झोपी गेल्यावर पोलीसह गावात भटकत नव्हते. गावातील रस्ते निर्मनुष्य होत होते.परिणामी चोरट्यांनी सौरऊर्जेच्या बॅटऱ्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले. भारनियमनाच्या काळातही चकाकणारे गावे बॅटऱ्या पळविल्या गेल्यामुळे अंधारात आहेत.आता पावसाचे दिव असताना गावागावात रात्रीला पथदिव्यांची सोय करणे आवश्यक आहे. यासाठी ग्राम पंचायतने पुढाकार घेण्याची गरज आहे.अनुदान तत्त्वावर सौर दिव्यांचे वाटपजिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अनुदान तत्वावर हे सौर दिवे देण्यात आले होते. भारनियमनाच्या तडाख्यात हे सौर दिवे दिलासा देत होते त्यामुळे ग्रामपंचायतींनी देखील गावातील मुख्य चौकामध्ये हे दिवे लावले होते.प्लास्टिक पेटीमधील बॅटऱ्या लंपासकमी उंचीच्या सौरदिव्यांमध्ये बॅटरी ठेवण्याकरिता लोखंडी व प्लास्टिकचे बॉक्स आहे. सहजपणे हात पोहचणाºया प्लास्टिकच्या बॉक्स मधील बॅटºया चोरट्यांनी शिताफीने चोरल्या आहेत. गावातील चौकात रात्री १० वाजतानंतर सामसूम होते. या वातावरणाचा नेमका फायदा चोरट्यानी घेतला. त्यामुळे दररोज गावातील सौर दिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंद केली जाते.

टॅग्स :Thiefचोर