कवलेवाडा प्रकरणातील सहा जण डिस्चार्ज

By Admin | Updated: July 6, 2014 23:58 IST2014-07-06T23:58:47+5:302014-07-06T23:58:47+5:30

बहुचर्चित कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे हत्याकांडात असलेल्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना पुराव्याअभावी व पोलिसांच्या तपासात आढळलेल्या वेगळ्याच

Six people discharged in the Kavalwada case | कवलेवाडा प्रकरणातील सहा जण डिस्चार्ज

कवलेवाडा प्रकरणातील सहा जण डिस्चार्ज

गोंदिया : बहुचर्चित कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे हत्याकांडात असलेल्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना पुराव्याअभावी व पोलिसांच्या तपासात आढळलेल्या वेगळ्याच प्रकारामुळे त्या सहा जणांना या गुन्ह्यातून न्यायालयाने ३० जून रोजी कलम १६९ सीआरपीसी अन्वये डिस्चार्ज (गुन्ह्यातून कमी) केले.
गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांची हत्या त्यांची पत्नी देवका खोब्रागडे (४५) व तिचा प्रियकर राजू गडपायले (४१) यांनी केला. मात्र या घटनेत मृत्यूपूर्वी बयाणात संजय खोब्रागडे यांनी गावातील ऋषिपाल चैतराम टेंभरे (४३), भाऊलाल शिवलाल हरिणखेडे (४७), श्रीप्रकाश हेतराम रहांगडाले (५१), पूनाजी प्रेमलाल ठाकरे (५७), हेमंत पुना ठाकरे (२९) व माधुरी ऋषिपाल टेंभरे (३५) यांनी जमिनीच्या वादातून पेट्रोल टाकून जाळल्याचे सांगितले होते. परंतु संजय खोब्रागडेला झोपेची गोळी देऊन त्याच्यावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रकार पत्नी देवका व तिचा प्रियकर राजू गडपायले याने केल्याचे पुरावे पोलिसांनी गोळा करून न्यायालयात सादर केले. या प्रकरणात १० जून २०१४ रोजी या घटनेचे साक्षीदार नेतराम चतर रहांगडाले (६०) व तेजलाल चुन्नीलाल रहांगडाले (४१) या दोघांचे १६४ सीआरपीसी प्रमाणे न्यायाधीशासमोर बयाण नोंदविण्यात आले. ११ जून रोजी भरत हिरालाल चौधरी (३५), संतोष योगराज पारधी (२९) व छन्नीलाल जुगराज पटले (४५) रा. इसाटोला या तिघांचे १६४ सीआरपीसीप्रमाणे न्यायाधीशासमोर बयाण नोंदविण्यात आले. या प्रकरणात आरोप असलेल्या सहा जणांना ३० जून रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गोंदिया येथील न्यायाधीश भगत यांनी डिस्चार्ज केले.
या प्रकरणात गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३०२, ३४ सहकलम ३ (१), (१०) ३ (२), (५) अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
मात्र या प्रकरणात या सहा जणांचा समावेश नसल्याने या प्रकरणात ३०२, ३४ कलम ठेवून उर्वरित सर्व कलमा कमी करण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six people discharged in the Kavalwada case