वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा मृत्यू

By Admin | Updated: June 14, 2014 01:23 IST2014-06-14T01:23:53+5:302014-06-14T01:23:53+5:30

रामनगर, गंगाझरी, अर्जुनी मोरगांव, सालेकसा व तिरोडा या पोलिस ठाण्यात गुरूवारी झालेल्या विविध घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला.

Six people die in different incidents | वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा मृत्यू

वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा मृत्यू

गोंदिया : रामनगर, गंगाझरी, अर्जुनी मोरगांव, सालेकसा व तिरोडा या पोलिस ठाण्यात गुरूवारी झालेल्या विविध घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला. रामनगर पोलिसांनी रिंग रोडच्या वाधवा निवासाजवळ मृतावस्थेत पडलेल्या ५५ वर्षाच्या इसमाची नोंद घेतली. मृत इसम भिकारी असावा असे सांगितले जाते. दुसरी घटना कटंगीकला येथील आहे. २३ एप्रिलच्या रात्री ८ वाजता स्वत:च्या घरी चूल पेटविण्यासाठी दिवा घेवून जात असताना एका महिलेच्या साडीने पेट घेतल्यामुळे तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. अंजली पवन चव्हान (३५) रा. कटंगी कला ही नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय उपचार घेत होती. तिसरी घटना गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुटीया येथील आहे. शिला सूरज कोठेवार (३३) ही महिला ७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ७७ टक्के भाजली. उपचार घेताना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तिचा मृत्यू झाला. चौथी घटना अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या महागाव येथील आहे. आनंदराव बळीराम नंदरधने (५०) रा.माहगाव यांनी विष प्राशन केल्यामुळे बुधवारच्या रात्री १०.३० वाजता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला. पाचव्या घटनेत सालेकसा तालुक्याच्या मुरपार येथील किशोर बिसन लटये (३०) याने सकाळी ६ वाजता स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याच्या घरातील लोक अंगणात झोपले होते. तो ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होता. त्याने मद्याच्या धुंदीत विष प्राशन करून आत्महत्या केली. सहावी घटना तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा येथील आहे. पांजरा येथील मनोज आसाराम उकेटोहने (४०) हे २९ मे च्या सायंकाळी ७.४५ वाजता मुंडीकोटा जवळ झालेल्या अपघातात गंभीर जख्मी झाले होते. उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six people die in different incidents