शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

न.प.च्या रिंगणात सहा उमेदवार

By admin | Updated: May 14, 2016 01:47 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी

एका उमेदवाराचा अर्ज मागे : आज होणार चिन्ह वाटप गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात सहा उमेदवार उरले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधील ‘ड’ गटातील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पोटनिवडणूक जाहीर केली. यांतर्गत सात उमेदवारांनी आपले १२ उमेदवारी अर्ज सादर केले होते. तर ३ मे रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत एकही अर्ज कापल्या गेला नव्हता. त्यामुळे सातही उमेदवार रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी पद्मकांत चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता रिंगणात उर्वरीत सहा उमेदवार उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या हा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीचे चित्र आणखी स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी उमेदवारांना अर्ज वाटप व उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आहे.प्रचार कार्य जोमात सुरू शहरातील फक्त एकाच जागेसाठी होत असलेल्या या पोटनिवडणुकीला घेऊन शहरवासीयांत पूर्वीपासूनच उत्सुकता होती. आता हळूहळू निवडणूक जवळ येत असल्याने राष्ट्रीय पक्षाने तिकीट जाहीर केलेल्या उमेदवारांचे प्रचार कार्यही जोमात सुरू झाल्याचे दिसते. यात राष्ट्रीय पक्षांकडून प्रचार सभाही घेतल्या जात असल्याचे दिसत आहे. याशिवाय अन्य उमेदवारही आपापल्या परीने प्रचार कार्याला लागले आहेत. हे उरले आता मैदानात या पोटनिवडणुकीत उमेश मनोहर दमाहे व नागेश्वर राजेश दुबे हे दोघे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर विनायक नत्थू खैरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून, लोकचंद सोमाजी रहांगडाले कॉंग्रेसकडून, दीपक सुधाकर बोबडे शिवसेनाकडून तर राजू विठ्ठलराव पारधी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.